- शीतल पाटीलसांगली - महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता प्रचाराचे नियोजन जोमात सुरू आहे. राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या रणांगणात राज्यपातळीवरील वरिष्ठ नेते प्रचारात सक्रिय होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, दोन्ही शिवसेना आदी पक्षांचे नेते विमानाने किंवा हेलिकॉप्टरने उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असल्याचे गृहीत धरून निवडणूक आयोगाने या हवाई सफरीचेही दरपत्रक जाहीर केले आहे. त्याचसोबत शाकाहारी, मांसाहारी भोजन, झेंडे, फलकापासून ते अगदी वाद्यांपर्यंतचे दर निश्चित केले आहेत. त्या दरानुसारच उमेदवार व राजकीय पक्षांना खर्च सादर करावा लागणार आहे. हा सारा खर्च उमेदवारांवर विभागून टाकला जाणार आहे.
आपल्या विजयाला हातभार लागावा म्हणून एखाद्या राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर नेत्यांची प्रचार सभा महत्त्वाची ठरू शकते. एखाद्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ एखादा नेता अशा प्रकारच्या साधनांचा वापर करून आला तर त्याचा सर्व खर्च त्या पक्षावर टाकला जाणार आहे. निवडणूक पुणे, मुंबईहून राजकीय नेते प्रचारात सहभागी होतील. त्यांच्यासाठी हेलिपॅडची व्यवस्था राजकीय पक्षांकडून करण्यात येते.
प्रचारातील वाहने, मंडप, व्यासपीठ, टेबल, खुर्च्या, हॅलोजन, जनरेटर, पंख्यापासून ते अगदी झेंडे. टोप्यांपर्यंतचे दर निश्चित केले आहेत. त्या दरानुसार उमेदवारांना खर्च सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांकडून होणारा खर्च उमेदवारांवर विभागून टाकला जाणार आहे.
खर्चाची मर्यादा नऊ लाखनिवडणूक आयोगाने यंदा उमेदवारांना ९ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. या खर्चात उमेदवारावर स्वत:च्या प्रचार यंत्रणेसोबतच त्याच्या पक्षाकडून होणाऱ्या खर्चाचाही भार पडणार आहे. एका प्रभागात चार उमेदवार असल्याने त्यांना ९ लाखांप्रमाणे ३६ लाखांपर्यंत खर्च करता येईल. पण आयोगाला हिशेब मात्र स्वतंत्ररीत्याच द्यावा लागणार आहे.
वाद्यांचे दर (प्रतिदिन)लेझीम : १०,०००हलगी पथक : ३०००झांज पथक : २०,०००
जेवणाचे दरशाकाहारी जेवण :साधी थाळी ७० रु.स्पेशल थाळी १२० रु
मांसाहारी जेवण :अंडाकरी थाळी १२० रु., मटण थाळी २०० रु.
-चहा एक कप : ७ रु.- नाष्टा : २५ रु.
राहण्याची व्यवस्था- नॉन ए.सी. डबल बेड : १८०० रु.-ए.सी. डिलक्स खोली : २४००- ए.सी. खोली एक्झिक्युटिव्ह : ३१०० रु. राॅयल सुट : ४०००
Web Summary : Election Commission fixes rates for leader travel, food, and campaign materials for municipal elections. Expenses, including leader visits by air, will be shared by candidates, impacting their spending within the 9 lakh limit. Rates are set for everything from tea to AC rooms.
Web Summary : चुनाव आयोग ने नगरपालिका चुनावों के लिए नेता यात्रा, भोजन और प्रचार सामग्री की दरें तय कीं। हवाई यात्रा सहित नेताओं के दौरे का खर्च उम्मीदवारों द्वारा साझा किया जाएगा, जिससे 9 लाख की सीमा के भीतर उनके खर्च पर असर पड़ेगा। चाय से लेकर एसी कमरों तक की दरें तय हैं।