शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय...विमानतळ रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
4
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
5
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
6
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
7
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
8
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
9
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
10
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
11
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
12
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
13
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
14
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
15
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
16
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
18
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
19
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
20
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आयुक्तपदी शुभम गुप्ता, तातडीने हजर होण्याच्या सूचना

By अविनाश कोळी | Published: April 08, 2024 4:30 PM

गुप्ता हे २०१९च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस

सांगली : गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांची मार्च महिन्यात जळगाव व नंतर बुलढाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी बुलढाण्याचा पद्भार स्वीकारला नसल्याने सोमवारी त्यांची सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली.मार्चमध्ये राज्यातील आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सांगलीतील आयुक्त व तीन उपायुक्तांची बदली करण्यात आली होती. सुनील पवार यांच्या बदलीनंतर आयुक्तपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त हाेते. सोमवारी त्याजागी गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे.गुप्ता हे २०१९च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस आहेत. देशात ६ व्या क्रमांकासह त्यांनी आयएएस परीक्षा उत्तीणे केली होती. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी त्यानंतर धुळे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर मार्चमध्ये सुरुवातीला त्यांची जळगाव जिल्हा परिषदेत व नंतर बुलढाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते.नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्याने त्यांची पुन्हा सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला बदली करण्यात आली आहे. याठिकाणी तातडीने त्यांना हजर होण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मूळ राजस्थानचे, नाते महाराष्ट्राशीगुप्ता यांचे कुटुंब राजस्थानमधील सीकरचे. काही काळ सीकरमध्ये वास्तव्य करुन ते जयपूरमध्ये स्थायिक झाले. २००७ पर्यंत ते सर्व जयपूरमध्ये राहत होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील डहाणू येथे स्थलांतरीत झाले. त्यामुळे महाराष्ट्राशीही त्यांचे चांगले नाते राहिले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त