सांगलीचा पारा ३४ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:33+5:302021-01-13T05:10:33+5:30

सांगली : जिल्ह्याच्या सरासरी कमाल तापमानात मंगळवारी अचानक मोठी वाढ झाली असून पारा ३४ अंशावर गेला आहे. किमान तापमानात ...

Sangli mercury at 34 degrees | सांगलीचा पारा ३४ अंशावर

सांगलीचा पारा ३४ अंशावर

सांगली : जिल्ह्याच्या सरासरी कमाल तापमानात मंगळवारी अचानक मोठी वाढ झाली असून पारा ३४ अंशावर गेला आहे. किमान तापमानात अंशाने घट झाली असली तरी दिवसा उकाडा जाणवत आहे.

भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या सहा दिवसांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसच्या घरात राहणार आहे. किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअसच्या घरात राहील. तापमानात वाढ झाल्यामुळे दिवसा अल्प उकाडा जाणवत आहे. रात्रीचे तापमानही आता सामान्य झाले आहे. आगामी आठवडाभर थंडीची शक्यता नाही. पारा खाली येण्याची कोणतीही शक्यता सध्या नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आठवडाभर आकाश निरभ्र राहणार आहे. जानेवारीच्या सरासरीपेक्षा कमाल तापमान २ अंशाने, तर किमान तापमान ५ अंशाने अधिक आहे. त्यामुळे उकाडा जाणवत आहे.

जानेवारीच्या शेवटच्या दहा दिवसांत थंडी पडण्याची शक्यताही कमी असून जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीला पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीचे सरासरी सामान्य तापमान हे ३४ अंश इतके असते. सध्याचे तापमान हे तेवढेच आहे. त्यामुळे थंडीचे पुन्हा आगमन होण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Sangli mercury at 34 degrees