शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : एम.सी.ई.डी. मार्फत इस्लामपूर येथे १५  मार्चपासून उद्योजकता विकास प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:30 IST

एम.सी.ई.डी. सांगली मार्फत उरूण इस्लामपूर येथे एक महिना कालावधीचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देएम.सी.ई.डी. मार्फत इस्लामपूर येथे १५ मार्चपासून उद्योजकता विकास प्रशिक्षण१५ मार्च २०१८ पासून प्रशिक्षण सुरू

सांगली : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही महाराष्ट शासनाची उद्योजक घडवणारी प्रशिक्षण संस्था आहे. जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरूण युवक-युवती यांना उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण देवून शासकीय योजनाव्दारे स्वयंरोजगार व उद्योगाबद्दल प्रोत्साहन देत असते.

या अनुषंगाने एम.सी.ई.डी. सांगली मार्फत उरूण इस्लामपूर येथे एक महिना कालावधीचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०१८ असून दिनांक १५ मार्च २०१८ पासून प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी ए. एम. खडककर यांनी दिली.खडककर म्हणाले, या प्रशिक्षण कार्यक्रमात स्वत:चा उद्योग व स्वयंरोजगार करण्यास इच्छुक सुशिक्षित बेरोजगार तरूण, तरूणींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधीची निवड प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, तसेच उद्योग व्यवसायास सहाय्यक करणाऱ्या विविध शासकीय विभागाच्या योजनांची माहिती, मालाचे मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन, उद्योग आधार नोंदणी इत्यादी अधिकारी वर्गाव्दारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच फळ प्रक्रिया, शेतीमाल प्रक्रिया, दूध उत्पादन व प्रक्रिया, शेळीपालन, कुक्कुट पालन, रेशीम उत्पादन व इतरही अनेक उद्योग व्यवसाय संधीबाबत तज्ज्ञ व्यक्तीव्दारा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.इच्छुक उमेदवारास उद्योग व्यवसाय उभारण्याची तीव्र इच्छा असावी. उमेदवार किमान दहावी पास व १८ ते ४० वयोगटातील असावा. इच्छुक उमेदवारांनी आधारकार्डची सत्यप्रत, शैक्षणिक मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला याच्या सत्यप्रती घेवून प्रवेश अर्ज सादर करावा.

प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अस्मिता आर. कोंडुसकर, कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सांगली, अक्षर कॉलोनी रोड नं. 9, कामेरी रोड इस्लामपूर येथे संपर्क साधावा.

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय