केंद्रीय तंत्रविज्ञान खात्यातर्फे उद्योजकता विकास कार्यशाळा

By admin | Published: July 9, 2015 09:53 PM2015-07-09T21:53:15+5:302015-07-10T00:34:34+5:30

नाशिक : कंेद्रीय तंत्रविज्ञान खाते, नवी दिल्ली पुरस्कृत स्टेड प्रकल्पाअंतर्गत उद्योगवर्धिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून १५ आणि १६ जुलै रोजी कालिदास कलामंदिर येथे दुपारी १२ ते ८ दरम्यान उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती सुनील चांडक, संचालक उद्योगवर्धिनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Entrepreneurship Development Workshop by Central Technology Department | केंद्रीय तंत्रविज्ञान खात्यातर्फे उद्योजकता विकास कार्यशाळा

केंद्रीय तंत्रविज्ञान खात्यातर्फे उद्योजकता विकास कार्यशाळा

Next

नाशिक : कंेद्रीय तंत्रविज्ञान खाते, नवी दिल्ली पुरस्कृत स्टेड प्रकल्पाअंतर्गत उद्योगवर्धिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून १५ आणि १६ जुलै रोजी कालिदास कलामंदिर येथे दुपारी १२ ते ८ दरम्यान उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती सुनील चांडक, संचालक उद्योगवर्धिनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विशेषत: तंत्रविज्ञान शिक्षित आणि सर्वसामान्यांमध्ये उद्योजकतेबद्दल आकर्षण निर्माण करून त्यांना उपलब्ध उद्योग-व्यवसाय संधी आणि त्यासाठी असणार्‍या शासकीय कर्ज आणि अनुदान योजनांची माहिती देऊन त्यांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी तत्पर करावे हा आहे. यातूनच १०० प्रशिक्षणार्थींची निवड करून त्यांना उद्योग निवडीपासून उभारणीपर्यंत सखोल मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मागील वर्षीदेखील अशा प्रकारचे भव्य आयोजन केले होते, त्यास ११०० नवउद्योजकांचा प्रतिसाद लाभला होता आणि १०५ लाभार्थींची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ प्रशिक्षणार्थींनी आपले व्यवसायदेखील सुरू केले आहेत.
चर्चासत्रात उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करत प्रवेशासाठी उद्योवर्धिनी, तिसरा मजला, निर्माण इन्सपायर, कान्हेरेवाडी, जुन्या सीबीएससमोर, नाशिक . फोन ७७७४०५४७१९, ९८२२९३४७१९ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Entrepreneurship Development Workshop by Central Technology Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.