सांगली बाजार समितीत गूळ, हळदीचे सौदे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:37+5:302021-06-04T04:20:37+5:30

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व गुळाचे सौदे सुरू झाले. सकाळी नऊ वाजता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत ...

Sangli market committee starts dealing in jaggery and turmeric | सांगली बाजार समितीत गूळ, हळदीचे सौदे सुरू

सांगली बाजार समितीत गूळ, हळदीचे सौदे सुरू

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व गुळाचे सौदे सुरू झाले. सकाळी नऊ वाजता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत सौद्यांसाठी शेतकरी व व्यापारी उपस्थित राहिले.

लॉकडाऊनमुळे गेले काही दिवस समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. गूळ, हळद व बेदाण्यांचे सौदेही झाले नाहीत. १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होताच समितीने सौदेही सुरू केले. गुरुवारी पहिल्याच दिवशी एक हजार ७७७ क्विंटल राजापुरी हळदीची आवक झाली. प्रतिक्विंटल कमीत कमी सहा हजार ते कमाल ११ हजार रुपयांचा दर मिळाला. सरासरी दर आठ हजार ७०० रुपये असा राहिला. गूळ सौद्यासाठी तीन हजार ५० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल जास्तीत जास्त तीन हजार ७७० दर मिळाला. सरासरी दर तीन हजार ४१० रुपये राहिला.

दरम्यान, सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले की, निर्बंध १०० टक्के रद्द झाले नसल्याने धान्य व इतर व्यवसाय मर्यादित वेळेतच सुरू राहतील. धान्य बाजार सकाळी सात ते अकरा या वेळेतच चालेल. त्यानंतर फक्त धान्य उतरवून घेण्याचेच काम चालेल. व्यापारी व ग्राहकांव्यतिरिक्त अन्य खासगी वाहनांना समितीत निर्बंध असतील. फळ मार्केटमध्येही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सौदे सुरू राहतील. ओळखपत्राशिवाय प्रवेश नसेल. बेदाण्याचे सौदे आज, शुक्रवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत निघणार आहेत.

Web Title: Sangli market committee starts dealing in jaggery and turmeric