शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : महावितरणची यंत्रणा पहिल्याच पावसाने ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:32 IST

गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात झालेल्या वळिवाच्या पहिल्याच पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्व उपनगरांतील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता, तर काही उपनगरांत शुक्रवारी सायंकाळपर्यंतही वीज गायबच होती.

ठळक मुद्देअनेक उपनगरांत २४ तास वीज गायब झाडे पडल्याने तारा जमीनदोस्त

सांगली : गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात झालेल्या वळिवाच्या पहिल्याच पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्व उपनगरांतील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता, तर काही उपनगरांत शुक्रवारी सायंकाळपर्यंतही वीज गायबच होती. दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी रात्रीपर्यंत काम केल्याने काही भागात विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला.गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यशवंतनगर, वसंतनगर परिसरात वादळी वारे व पावसाचा जोर अधिक होता. शहरातही पावसापेक्षा वारे अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी डिजिटल फलक फाटून वीजतारांत अडकल्याने तारा तुटण्याच्या घटना घडल्या.

अचानक वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने महावितरणची मात्र कसोटी लागली. महावितरणकडून पावसाळापूर्व विद्युत वाहक तारा झाडांच्या फांद्यांपासून मोकळ्या करण्याचे काम सुरू असतानाच, गुरूवारी फांद्या तुटून तारांवर पडल्याने अधिक नुकसान सोसावे लागले.सिव्हिल चौकातील भुयारी लाईनमध्ये बिघाड झाल्याने त्या भागातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद होता. हा बिघाड दुरूस्त करून गुरूवारी रात्रीच वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.जलतरण तलाव, भगतसिंग चौक, शामरावनगर, गजराज कॉलनी, रॉकेल लाईन वखारभाग, मिशन कंपौंड, राम मंदिर चौक, काळीखण, टिंबर एरिया, जोतिबा मंदिर, गावभाग, सांगलीवाडी, जुने जिल्हाधिकारी कार्यालय या भागात झाडांच्या फांद्या पडून तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या सर्व ठिकाणी पर्यायी व्यवस्था (रिंंग फिडींग) करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कार्यतत्परतागुरूवारी रात्री साडेआठपर्यंत वादळी वारे व पाऊस सुरू होता. त्यानंतरही वारे कायम असताना महावितरणचे कर्मचारी तमा न बाळगता तारा जोडणीसाठी रात्रीच कार्यरत होते. रात्र जागून काढत कर्मचाऱ्यांनी काही भागातील वीज पुरवठा सुरळीत केला.यशवंतनगरमध्ये २४ तास वीज गायबयशवंतनगरमध्ये विद्युत तारा तुटल्याने गुरूवारी सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित होता. शुक्रवारी सायंकाळीही तो सुरळीत झाला नव्हता. विश्रामबाग येथून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानेच या भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यात अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसmahavitaranमहावितरण