शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :  करगणीतील लूटमार; तिघांच्या टोळीस अटक-बलवडी रस्त्यावर सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:12 IST

येथील अक्षय मोहन दबडे यांना बेदम मारहाण करुन लुबाडणाºया तिघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुरुवारी रात्री यश आले. टोळीकडून मोबाईल, दुचाकी व रोकड असा एक लाखाचा माल जप्त केला आहे

ठळक मुद्दे आठवड्यात छडा : लाखाचा माल जप्तत्यांना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

सांगली : करगणी (ता. आटपाडी) येथील अक्षय मोहन दबडे यांना बेदम मारहाण करुन लुबाडणाºया तिघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुरुवारी रात्री यश आले. टोळीकडून मोबाईल, दुचाकी व रोकड असा एक लाखाचा माल जप्त केला आहे. गोमेवाडी-दबडेवाडी रस्त्यावर १७ नोव्हेंबरला लूटमारीची ही घटना घडली होती.अटक केलेल्यांमध्ये सुजित ऊर्फ आनंदा तुकाराम काळे (वय २३, रा. लेंगरे), मिलिंद जनार्दन गिड्डे (२१, वारे हॉस्पिटलजवळ, विटा, ता. खानापूर) व अक्षय शामराव साठे (२३, आंबेगाव, ता. कडेगाव) यांचा समावेश आहे. त्यांना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

अक्षय दबडे हे करगणीत लक्ष्मीनगरमध्ये राहतात. त्यांचा बिअर बार  आहे. १७ नोव्हेंबरला ते रात्री पावणेअकरा वाजता दुकान बंद करुन दुचाकीवरुन घरी निघाले होते. गोमेवाडी-दबडेवारी रस्त्यावर रेड्याचे टेक येथे ते गेल्यानंतर संशयितांनी त्यांना अडविले. त्यांना बेदम मारहाण केली व त्यांच्याकडील ४६ हजाराची रोकड, एक मोबाईल घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. 

दबडे यांना लुबाडणारी ही टोळी खानापूर तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली. तसेच गुरुवारी रात्री ते बलवडी-तामखडी रस्त्यावरुन जाणार असल्याचीही माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, पोलीस शिपाई सूर्यकांत सावंत, जितेंद्र सावंत, नीलेश कदम, उदय साळुंखे, संदीप पाटील, अरुण सोकटे यांच्या पथकाने सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे एकाच दुचाकीवरुन जाताना   आढळून आले. त्यांना थांबवून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दबडे यांना लुबाडल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १३ हजाराची रोकड, चार मोबाईल व हेल्मेट असा एक लाखाचा माल जप्त केला.पाळत ठेवून लुबाडलेअटकेतील तिघे पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. त्यांनी पाळत ठेवून दबडे यांना लुबाडल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी त्यांनी लूटमारीचे गुन्हे केले आहेत का? याबद्दल चौकशी केली जात आहे. दबडे यांच्याकडून मिळालेली ४६ हजाराची रोकड त्यांनी समान वाटणी करुन घेतली होती.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस