शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर संजय पाटील जिंकले असते?, सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास अनेक घटक कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 16:09 IST

'हे' नेते गेले विराेधात

सांगली : विजयाबद्दलचा अतिआत्मविश्वास, नरेंद्र मोदींच्या जादूवर विसंबून राहण्यातील धन्यता तसेच अंतर्गत गटबाजीकडे केलेले दुर्लक्ष अशा अनेक घटकांमुळे भाजपने सांगली लोकसभेचा गड गमावला. नव्या चिन्हासह अपक्ष निवडणूक लढवूनही विशाल पाटील यांनी मिळविलेला विजय भाजपला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे. नको त्या गोष्टीत ताकद लावण्यापेक्षा आवश्यक तिथे ऊर्जा खर्ची केली असती, तर संजय पाटील निवडून आले असते, असा तर्क लढविला जात आहे.सर्वात अगोदर उमेदवारी जाहीर करून पक्ष कार्यालय थाटणाऱ्या भाजपला प्रचारासाठी सर्वाधिक वेळ मिळाला होता. पण, उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यातून उफाळलेली नाराजी दुर्लक्षित करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धन्यता मानली. दुसरीकडे उमेदवार असलेले संजय पाटील यांच्या समर्थकांनीही गटबाजीला सबुरीने हाताळण्याऐवजी ‘जशास तसे’ भूमिका स्वीकारली. त्यामुळे वाद शांत होण्याऐवजी चिघळत गेला. वाद मिटविण्यासाठी उमेदवारासह एकाही वरिष्ठ नेत्याने राजकीय कौशल्य वापरले नाही.जतचे माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख यांची नाराजी त्यांना शेवटपर्यंत दूर करता आली नाही. मिरजेतील काही नगरसेवकांनीही संजय पाटील यांच्याविरोधात उघडपणे काम सुरू केले. त्यांना शांत करण्याची जबाबदारी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घेतली, मात्र ते त्यात फारसे यशस्वी झाले नाहीत. मतदान जवळ आल्यानंतर केलेली धडपड कामी आली नाही. सर्व नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यामागे मोदी मॅजिकवरील अवलंबित्व हेच कारण होते.

नको त्या गोष्टीत ताकदप्रतिस्पर्धी उमेदवारासमोर अनेक अपक्ष उमेदवार उभे करणे, चांगले चिन्ह मिळू नये यासाठी बुद्धीचा वापर करणे, विजयासाठी आवश्यक माहितीचे संकलन करण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या व्यक्तिगत जीवनातील माहिती गोळा करणे अशा गोष्टीतच उमेदवाराच्या समर्थकांनी अधिक ताकद खर्ची घातली.

मतांच्या विभागणीवरच अधिक लक्ष२०१९च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यात मतांची विभागणी होऊन भाजपला फायदा झाला होता. तोच फॉर्म्युला यंदाच्या निवडणुकीत वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आला. मात्र, ही खेळी काँग्रेस नेत्यांनी प्रचारापूर्वीच उजेडात आणल्याने भाजपचे हे छुपे अस्त्र निकामी झाले.

..तर निकाल वेगळा असताकाँग्रेसमध्ये आमदार विश्वजीत कदम यांनी गटबाजीला मूठमाती देऊन सर्व नेत्यांची मोळी जशी बांधली तशी भाजपला बांधता आली असती तर कदाचित यंदाच्या लोकसभेत भाजपच्या पदरात यश पडले असते. पण, त्यांना या निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला.

हे नेते गेले विराेधातजतमधून माजी आमदार विलासराव जगताप, कडेगावमधून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या स्वकीय नेत्यांसह कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे, खानापूर मतदारसंघातून बाबर कुटुंबीय यांच्याशी संजय पाटील यांचे सूर कधीच जुळले नाहीत. नेमकी हीच गोष्ट विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडली. वेळीच नात्यांची डागडुजी झाली असती तर त्याचा फायदा संजय पाटील यांना झाला असता.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालsanjaykaka patilसंजयकाका पाटीलBJPभाजपा