शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाका पाटलांनी मविआ'ला पुन्हा डिवचलं; विशाल पाटलांना कोंडीत पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 18:51 IST

Sangli Lok Sabha Election : आता सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील बंडखोरी करणार की चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार, अशा चर्चा सुरू आहेत.

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर आता काँग्रेसनेही दावा केला असून, आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी या जागेसाठी दिल्लीवारीही केली. यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील बंडखोरी करणार की चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार, अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज भाजपाचे  खासदार संजयकाका पाटील यांनी महाविकास आघाडीला डिवचलं आहे. 

काँग्रेसकडून आंध प्रदेशात ५ उमेदवार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला उतरवलं मैदानात

"मी मतदारसंघात सातत्याने फिरतो. लोकांच्यातून चांगला प्रतिसाद आहे, लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. उद्या महाविकास आघाडीची बैठक आहे, या बैठकीत काय होईल मला माहित नाही. यात एकच उमेदवार असती, शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. विशाल पाटील यांनी तिकीटाची मागणी केली आहे, तेव्हा उद्या काँग्रेस काही निर्णय घेईल. दोन्ही उमेदवार विरोधात आले तरी फक्त लिड कमी येईल. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे त्यामुळे आमची बाजू वरचढ आहे, असंही खासदार संजयकाका पाटील म्हणाले. 

"निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मैदानात येऊ दे मग मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो. ३५ वर्षे त्यांच्याकडे खासदारकी होती. स्टाईल मारुन भाषणं केली म्हणून लोक स्विकारतात असं नाही, असा टोलाही संजयकाका पाटील यांनी लगावला.  

"माझ्यादृष्टीने कोण विरोधक आहे यावर निवडणूक नाही, मी केलेले काम याची फक्त उजळणी करायची आहे, मी आता विशाल पाटलांना सांगतो तुम्ही फक्त मैदानातून पळ काढू नका. जर तुम्हाला सहानभुती मिळाली असं वाटतं असेल तर एकदा लोकांच्यात जाऊन निवडणूक आजमावूया, असंही संजयकाका पाटील म्हणाले. 

"चंद्रहार पाटील एक चांगले पैलवान"

पैलवान या महायुतीचे उमेदवार आहेत, ते एक चांगले पैलवान आहेत. त्यांनी महाराष्ट्र केसरी म्हणून दोनवेळा लौकीक मिळवला आहे. ते समाजकारणात काम करायचं म्हणून आले आहेत. निश्चितपणाने मी या सगळ्या गोष्टींचं स्वागत करतो, असंही संजयकाका पाटील म्हणाले.  

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना