शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

सांगली लोकसभा: प्रकाश शेंडगे यांच्या नावे पावणेपाच कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 19:33 IST

पत्नी रेणुका यांचे नावे १९ लाख रुपये किमतीचे यॉट (समुद्रातील छोटे जहाज)

सांगली : लोकसभेसाठी प्रकाश शेंडगे यांनी अपक्ष म्हणून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत आर्थिक स्थिती प्रतिज्ञापत्रातून सादर केली.त्यांनी आयकरकडे पाच वर्षांत ९६ लाख २९ हजार ६५० रुपयांचे उत्पन्न दाखविले आहे. विविध बँक खात्यांत १४ लाख ६५ हजार ०२३ रुपये असून एक लाखाची रोकड आहे. विविध कंपन्यांचे ५ लाख ४२ हजार ०६० शेअर्स आहेत. त्यांचे बाजारमूल्य ५७ लाख ७६ हजार ३५० रुपये आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यात १ लाख २६ हजार १३५ रुपये आहेत. विलास ट्रान्सपोर्ट कंपनीला ५२ लाख ६३ हजार ३७० रुपये आणि पीएसपीएल कंपनीला २९ लाख ३१ हजार ४० रुपयांचे कर्ज दिले आहे. त्यांच्याकडे २१ लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आहेत. मालकीची मोटर नाही.विलास ट्रान्सपोर्ट ही १ कोटी २२ लाख ३६ हजार १७१ रुपये मूल्याची फर्म असून दोन कंपन्यांमध्ये एक लाख रुपयांची भागीदारी आहे. मूळ गाव केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे ४.१५ हेक्टर शेती व सांगलीत पाच गुंठे प्लाॅट आहे. त्याची एकत्रित किंमत ७५ लाख रुपये होते. भविष्य निर्वाह निधी योजनेसंदर्भात एक दावा २०१८ मध्ये मुंबईत दाखल आहे.पत्नी रेणुका यांचे पाच वर्षांतील उत्पन्न ३२ लाख ५४ हजार ४५० रुपये आहे. विविध बँक खात्यांत २ लाख ९८ हजार ६८४ रुपये शिल्लक असून ७५ हजार रुपयांची रोकड आहे. १८ लाख १ हजार ५०० रुपये किमतीच्या विमा पॉलिसी आहेत. पीएसपीएल कंपनीला १४ लाख ११ हजार ८२० रुपयांचे कर्ज दिले आहे.स्वत:चे यॉटरेणुका यांच्या नावे १९ लाख रुपये किमतीचे यॉट (समुद्रातील छोटे जहाज) आहे. पावणेदोन किलो वजनाचे १ कोटी २२ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आहेत. साडेचार किलोंचे ३ लाख ५४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आहेत. एक मोटारही आहे. बांधकाम कंपनीत ५० हजारांची भागीदारी आहे. केरेवाडीत ६.२७ हेक्टर शेती असून तिची किंमत ६१ लाख १० हजार रुपये आहे. त्यांच्या नावे १४ लाख ७० हजार ७९० रुपयांचे वाहन कर्ज, ७ लाख ७५ हजार २५४ रुपयांचे व्यक्तिगत कर्ज, ४९ लाख १८ हजारांचे सुवर्ण कर्ज आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४