शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली एलबीटीप्रश्नी भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:56 IST

सांगली : महापालिकेच्या एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीला अखेर स्थगिती आदेश मिळाला असला तरी, या प्रश्नावरून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेच्यावतीने येत्या १२ जून रोजी एलबीटीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. तत्पूर्वीच भाजपने स्थगिती आदेश आणून बैठकीची हवाच काढण्याचा प्रयत्न केला. पण ही ...

सांगली : महापालिकेच्या एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीला अखेर स्थगिती आदेश मिळाला असला तरी, या प्रश्नावरून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेच्यावतीने येत्या १२ जून रोजी एलबीटीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. तत्पूर्वीच भाजपने स्थगिती आदेश आणून बैठकीची हवाच काढण्याचा प्रयत्न केला. पण ही स्थगिती तात्पुरत्या स्वरुपाची असून असेसमेंट तपासणी व वसुलीचे भूत अद्यापही व्यापाऱ्यांवर कायम असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्यांनी दिली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केले. असेसमेंट तपासणी व वसुलीवर बहिष्कारही टाकला. राज्यात भाजपची सत्ता येताच एलबीटी रद्द झाला तरी, वसुलीचे त्रांगडे कायम होते. त्यालाही व्यापाºयांनी विरोध केला. व्यापारी एकता असोसिएशनच्या नेतृत्वाखाली व्यापार बंद, उपोषण करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या जिल्हा व राज्यपातळीवरील नेत्यांपर्यंत हा प्रश्न नेण्यात आला. पण त्यावर कायमस्वरुपी तोडगा निघू शकला नाही. अखेर गुरुवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सांगली महापालिका क्षेत्रातील एलबीटी वसुलीस व असेसमेंट तपासणीला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना खूश करण्यासाठी भाजपचे नेते यशस्वी ठरले आहेत. पण या आदेशावरून आता नेमके श्रेय कुणाचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

व्यापारी संघटनेने महिन्याभरापूर्वी शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने यांच्या माध्यमातून संपर्कप्रमुख खा. गजानन कीर्तीकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी कीर्तीकर यांनी एलबीटीप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कीर्तीकर यांनी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत येत्या १२ जून रोजी व्यापारी, महापालिका अधिकाºयांची संयुक्त बैठकही मुंबईत बोलाविली होती.

या बैठकीत एलबीटीवर तोडगा काढण्याचा निर्धार शिवसेना नेत्यांसह शेखर माने यांनी केला होता. तशी तयारीही चालविली होती. पण शिवसेनेच्या बैठकीपूर्वीच भाजपने एलबीटीला स्थगिती दिल्याचा आदेश नगरविकास विभागाकडून आणला. त्यामुळे आता या बैठकीची हवाच गुल झाली आहे. पण स्थगिती आदेश हा तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. भविष्यात ही स्थगिती उठून पुन्हा वसुली सुरू होऊ शकते, असे शिवसेना नेत्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, १२ जूनच्या बैठकीवर अनिश्चिततेचे ढग आहेत. महापालिका प्रशासनालाही बैठकीचे पत्र मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.भाजपकडून व्यापाऱ्यांना गाजर : मानेशिवसेनेने एलबीटीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा निर्धार करीत अर्थराज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे नियोजन केले होते. तसे पत्रही व्यापारी संघटनेला दिले आहे. आता स्थगिती आदेश आल्याने बैठक घ्यायची की नाही, याचा विचार आम्ही करीत आहोत. पण शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. भविष्यात ही स्थगिती उठून पुन्हा वसुलीचे भूत व्यापाºयांच्या मानगुटीवर बसणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने व्यापाºयांना गाजर दाखविले आहे. गाजराला भुलायचे की नाही, हे व्यापाºयांनी ठरवावे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक शेखर माने यांनी दिली.सहा महिन्यांनंतर स्थगितीभाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पुढाकाराने हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलबीटी वसुलीला स्थगितीचे आदेश दिले होते. पण नगरविकास विभागाकडून हा आदेशच काढला जात नव्हता. व्यापारी संघटना व गाडगीळ यांनी वारंवार पाठपुरावा करूनही नगरविकास विभागाने त्याला दाद दिली नव्हती. अखेर सहा महिन्यांनंतर स्थगिती आदेश आला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच आदेश कसा आला? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीTaxकर