शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

सांगली : कुपवाड एमआयडीसीत ट्रक चालकास लुबाडले, तीन चोरट्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 17:43 IST

कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअरसमोर थांबलेल्या एका ट्रक चालकास तीन अज्ञात चोरट्यांनी धमकी देऊन ट्रकमधील शंभर किलोचा सात हजार रुपये किमतीचा लोखंडी खांब चोरी करून नेल्याची तक्रार कुपवाड पोलिसात सोमवारी सकाळी दाखल झाली असून, पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देकुपवाड एमआयडीसीत ट्रक चालकास लुबाडलेतीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअरसमोर थांबलेल्या एका ट्रक चालकास तीन अज्ञात चोरट्यांनी धमकी देऊन ट्रकमधील शंभर किलोचा सात हजार रुपये किमतीचा लोखंडी खांब चोरी करून नेल्याची तक्रार कुपवाड पोलिसात सोमवारी सकाळी दाखल झाली असून, पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुरेश नारायण चव्हाण (वय ४९, रा. कवठेमहांकाळ) हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसीतून ट्रकमधून (क्र. एमएच ०९ एल ३३७) लोखंडी खांब भरून रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअरमध्ये आले होते. हे हार्डवेअर दुकान बंद असल्याने चव्हाण यांनी दुकानासमोर ट्रक थांबविला होता.यावेळी तीन अज्ञात चोरटे चारचाकी वाहनातून आले. त्यांनी ट्रक चालक सुरेश चव्हाण यांना ट्रकमधून खाली उतरवून धमकी देऊन ट्रकमधील शंभर किलो वजनाचा सात हजार रुपये किमतीचा लोखंडी खांब काढून तो आपल्या वाहनातून घेऊन गेले.

याबाबत कुपवाड पोलिसात तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. हवालदार प्रवीण यादव तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली