सांगलीत कृष्णा नदीपातळीत तीन फुटांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:16+5:302021-09-14T04:31:16+5:30
सांगली : सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी पावसाने हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही वाढला असून, कोयनेतून ...

सांगलीत कृष्णा नदीपातळीत तीन फुटांनी वाढ
सांगली : सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी पावसाने हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही वाढला असून, कोयनेतून ४५ हजार, तर वारणा धरणातून ८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी चोवीस तासांत तीन फुटांनी वाढ झाली आहे.
सांगली, मिरज शहरांत सोमवारी पावसाने हजेरी लावली. अधून-मधून विश्रांती घेत पावसाने दिवसभर ठाण मांडले होते. ढगांची दाटीही कायम आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर अद्याप कायम आहे. कोयना धरण क्षेत्रात सोमवारी सायंकाळी ३७ मिमी. पाऊस झाला. त्यामुळे धरणातील विसर्ग वाढविण्यात आला आहे. सोमवारी ४५ हजार ३७४ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चोवीस तासांत जिल्ह्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होणार असून, धरण पाणलोट क्षेत्रातील जोर वाढणार आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग नदीकाठच्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
चौकट
जिल्ह्यातील कृष्णेची पाणीपातळी (फूट)
बहे ९.३
ताकारी २०.६
भिलवडी १८.१
सांगली १२
अंकली १५.६
म्हैसाळ २५.१