सांगलीत कोटणीस महाराज पुण्यतिथी महोत्सव २८ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:11 AM2021-01-24T04:11:27+5:302021-01-24T04:11:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सद‌्गुरू कोटणीस महाराज यांचा ९७ वा पुण्यतिथी महोत्सव २८ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान साजरा ...

Sangli Kotnis Maharaj Punyatithi Festival from 28th | सांगलीत कोटणीस महाराज पुण्यतिथी महोत्सव २८ पासून

सांगलीत कोटणीस महाराज पुण्यतिथी महोत्सव २८ पासून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सद‌्गुरू कोटणीस महाराज यांचा ९७ वा पुण्यतिथी महोत्सव २८ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त व्याख्याने, कीर्तन-भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती हभप गुरुनाथ कोटणीस यांनी दिली.

गुरुवारी (दि. २८) संध्याकाळी भक्तिसंगीत, शुक्रवारी जनार्दन महाराज यरगट्टीकर यांचे आशीर्वचन व प्रशांत मोरे-देहूकर यांचे निरुपण होईल. शनिवारी दीपक केळकर यांचे प्रवचन, डॉ. दिलीप पटवर्धन यांचे व्याख्यान आणि चैतन्य महाराज वास्कर यांचे निरुपण आहे. रविवारी करवीरपीठ शंकराचार्य यांचे आशीर्वचन, संजय कोटणीस यांचे प्रवचन होईल. सोमवारी सदाशिव म्हेत्रे यांचे प्रवचन, हेमंत जोशी यांचे ‘शिवरायांचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान आणि लक्ष्मण गुंडा महाराज सिद्धरस यांचे निरुपण होईल. मंगळवारी सकाळी डॉ. शरद गद्रे यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. दुपारी आराधनेचे कीर्तन आणि विधी होईल.

याशिवाय दररोज सकाळी पालखी सेवा, काकड भजन होणार आहे. सर्व कार्यक्रम बसस्थानक रस्त्यावरील कैवल्यधाममध्ये होतील. श्रद्धाळूंनी लाभ घेण्याचे आवाहन संजय कोटणीस, धनंजय कोटणीस यांनी केले आहे.

-------

Web Title: Sangli Kotnis Maharaj Punyatithi Festival from 28th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.