किक बॉक्सिंगमध्ये सांगलीला दोन पदके
By Admin | Updated: July 23, 2015 00:12 IST2015-07-22T23:35:05+5:302015-07-23T00:12:34+5:30
विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षक हामजेखान मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले

किक बॉक्सिंगमध्ये सांगलीला दोन पदके
सांगली : चिखली (जि. बुलडाणा) येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत किक बॉक्सिंग असोसिएशन आॅफ सांगलीच्या खेळाडूंनी दोन पदके पटकावली. विजेते खेळाडू असे : अतुल नामदेव धांधुरे (७१ किलोत सुवर्णपदक), शाहबाज आदम मुजावर (६० किलोत कांस्यपदक). यशस्वी खेळाडूंची बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षक हामजेखान मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)