शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुची येथील द्राक्ष उत्पादकांना साडेचौदा लाखांचा गंडा, आंध्र प्रदेशातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:02 IST

पोलिस आंध्रात रवाना होणार

कवठेमहांकाळ : तालुक्यातील कुची येथील तीन शेतकऱ्यांकडून द्राक्ष माल खरेदी करून एक महिन्यात पैसे देतो, असे सांगून आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कृष्णदेव पंडित डुबोले (वय ४९, रा. कुची) या शेतकऱ्याने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सिरगम रमेश, सिरगम कोंडलराम, सिरगम मुरली कृष्णा (रा. रावलपालम) या आंध्रातील तीन व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी सिरगम रमेश, सिरगम कोंडलराम व त्याचे वडील सिरगम मुरली कृष्णा यांची आंध्र प्रदेशात रावलपालम येथे साई फ्रूट कंपनी आहे. फिर्यादी कृष्णदेव पंडित डुबोले यांच्याशी २०२२ मध्ये ओळख झाली. डुबोले यांच्या शेतात ९,२६,५११ रुपये किमतीचा २१ टन ५८४ किलो द्राक्षमालाच्या ६,५६४ पेट्या व तात्यासाहेब राजाराम पाटील (रा. कुची) यांच्या शेतातील १,९९,३२० रुपये किमतीचा ४ टन ९८० किलो मालाच्या १,२४५ पेट्या, तसेच मुरारराव ज्ञानदेव पाटील (रा. कुची) यांच्या शेतातील ३,२३,४०० रुपये किमतीचा ९ टन २४० किलो द्राक्षमालाच्या २,३१० पेटी, असा माल त्यांनी खरेदी केला. फिर्यादी डुबोले व दोन शेतकऱ्यांना द्राक्षमालाचे एकूण १४,४९,२३१ रुपये एका महिन्यानंतर देतो, असे सांंगितले. फिर्यादी व दोन शेतकऱ्यांनी द्राक्षमालाचे पैसे परत मिळण्यासाठी आजपर्यंत वारंवर पाठपुरावा केला; परंतु मालाची रक्कम न मिळाल्याने तिघांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डुबोले यांनी तिघांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलिस तपास करीत आहेत.

पोलिस आंध्रात रवाना होणारदरवर्षी द्राक्ष बागायतदारांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर येतात. यंदाही हंगाम सुरू झाल्यानंतर कवठेमहांकाळ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कवठेमहांकाळ पोलिस लवकरच आंध्र प्रदेशकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Grape farmers defrauded of ₹14.5L, case against Andhra traders.

Web Summary : Three Andhra Pradesh traders allegedly defrauded grape farmers in Sangli's Kuchi of ₹14.5L. The traders promised payment within a month but failed to deliver. A police case has been registered, and authorities are preparing to travel to Andhra Pradesh to apprehend the accused.