सांगलीत तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:18+5:302021-03-23T04:29:18+5:30

सांगली : सांगली परिसरातील २७ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातून ती ...

Sangli girl raped for marriage | सांगलीत तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

सांगलीत तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

सांगली : सांगली परिसरातील २७ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही करण्यात आला. या प्रकरणी सागर प्रकाश कोळेकर (वय २४, रा. श्रीरामनगर, गल्ली क्र. ८, विजयनगर, सांगली) याच्यावर विश्रामबाग पाेलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केले होते. दरम्यान, तरुणीचा विवाह झाला. या वेळी संशयित कोळेकर याने तिला, ‘लग्नानंतर पाच दिवसांनी परत ये, आपण दोघे निघून जाऊ’, असे सांगितले होते. त्यानुसार ती परतल्यानंतर कोळेकरने तिला जयसिंगपूर येथे नेत बलात्कार केला. जयसिंगपूरमध्येच खोली भाड्याने घेऊन ते राहत होते. त्यानंतर सांगलीत ते राहण्यास आले. या कालावधीत त्याने तिच्यावर बलात्कार केला.

यातून ती गर्भवती राहिल्यानंतर कोळेकरने मूल आपले नाही म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. तसेच तिला गोळी देऊन गर्भपात केला. त्याने लग्नास नकार दिल्याने अखेर पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangli girl raped for marriage