सांगलीत पुराने टाकला दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST2021-07-29T04:27:19+5:302021-07-29T04:27:19+5:30

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. कृष्णा नदीकाठावरील जामवाडी, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौकासह, मारुती चौक या ...

Sangli floods | सांगलीत पुराने टाकला दम

सांगलीत पुराने टाकला दम

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. कृष्णा नदीकाठावरील जामवाडी, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौकासह, मारुती चौक या परिसरांत अद्यापही पुराचे पाणी आहे. श्यामरावनगरमधील काही भागांत पाणी साचून आहे.

शहरातील पुराने दम टाकला आहे. टिळक चौक, कोल्हापूर रोड या दोन्ही रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. बायपास रस्त्यावर खुला झाल्याने, इस्लामपूरकडे जाणारी अवजड वाहतूक सुरू झाली आहे. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, ईदगाह मैदान, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी परिसरात अद्यापही पुराचे पाणी आहे. मारुती चौकातही दोन ते तीन फूट पाणी आहे. टिळक चौकातील जनावरांच्या बाजारातील पाणी कमी झाल्याशिवाय मारुती चौक खुला होणार नाही.

स्टेशन चौकातही दोन ते तीन फूट पाणी आहे. ट्रक पार्किंगमध्ये पाणी असल्याने, तेथील पाणी जाण्यास वेळ लागणार आहे. इतर भागातील पाणी बऱ्यापैकी ओसरले आहे. कोल्हापूर रोडवरील पाणी कमी झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे, पण श्यामरावनगरच्या अनेक भागांत अद्यापही पाणी आहे. या परिसरातील पाणी बाहेर काढण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

Web Title: Sangli floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.