शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पूर: पूरग्रस्तांना वाचविणारी बोट उलटली; 14 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:56 IST

या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. 

सांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या ३२ नागरिकांना बाहेर काढत असताना नाव पलटी झाली असून नावेतील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह सापडले असून इतर १६ जणांचा शोध सुरु आहे. ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो. सध्या कृष्णा नदीला महापूर आला असून ब्रह्मनाळ येथे नदीचे पात्र अक्राळविक्राळ बनले आहे. संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला असून, गावात तीन दिवसांपासून पाणी आहे.

गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या नावेतून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात येत होते. नावेत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ३२ जण बसले होते. नाव कडेने गावाबाहेर जात असताना नावेचा पंखा पाण्यातील झाडात आणि पाईपमध्ये अडकला. नावेतील वाढलेले वजन आणि पंखा अडकल्याने नाव उलटली. पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने नावेतील कोणालाच काहीही करता आले नाही. पोहता येणारे दोघेजण पाण्यात झाडाझुडपांना धरून राहिले. मात्र इतरजण बुडाले. बत्तीसपैकी १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी काही पाण्याबरोबर वाहून जाऊन कडेला अडकले होते.

आणखी 16 जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरूस्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय पथक बचावकार्यात सहभागी आहे. घटनास्थळी आक्रोश आणि गोंधळ सुरू आहे. गावात आणखी २०० ग्रामस्थ अडकून पडले असून, त्यांच्यासाठी बोटींची सोय अजूनही करण्यात आलेली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर, सातारा, सांगलीत पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. 

 

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वोतोपरी  प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सुमारे 15 हजार 836 कुटुंबांतील 82 हजार 405 लोक व 22 हजार 258 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 19 गावांतील 3 हजार 911 कुटुंबांतील 20 हजार 898 लोक व 5 हजार 883 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 22 गावांतील 4 हजार 565 कुटुंबांतील 21 हजार 32 लोक व 5 हजार 828 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 32 गावांतील 6 हजार 142 कुटुंबांतील 30 हजार 659 लोक व 7 हजार 799 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 17 गावांतील 311 कुटुंबांतील 1 हजार 399 लोक व 2 हजार 305 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 907 कुटुंबांतील 8 हजार 417 लोक व 443 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAccidentअपघात