शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : विटा साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:47 IST

सांगली जिल्ह्यातील भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने विटा शहरापासून दोन कि.मी. अंतरावर भारतातील पहिला अत्याधुनिक व सर्वसोयीनियुक्त असा राष्ट्रकुल कुस्ती आखाडा उभा राहत आहे. सुमारे ११ कोटी रूपये खर्चाच्या या कुस्ती संकुलात पाचशे मल्लांना लाल माती व मॅटवरील कुस्तीचे धडे दिले जाणार आहेत.

ठळक मुद्देविटा साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा पाचशे मल्लांना लाल माती व मॅटवरील कुस्तीचे धडे दिले जाणार

दिलीप मोहिते विटा : सांगली जिल्ह्यातील भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने विटा शहरापासून दोन कि.मी. अंतरावर भारतातील पहिला अत्याधुनिक व सर्वसोयीनियुक्त असा राष्ट्रकुल कुस्ती आखाडा उभा राहत आहे. सुमारे ११ कोटी रूपये खर्चाच्या या कुस्ती संकुलात पाचशे मल्लांना लाल माती व मॅटवरील कुस्तीचे धडे दिले जाणार आहेत.भाळवणी येथील डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांना, ग्रामीण भागातील मुलांना कोल्हापूर, पुणेसारख्या ठिकाणी कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात येत नाही, त्यामुळे या भागात कुस्ती संकुलाची उभारणी करण्याची संकल्पना सुचली.

ही संकल्पना त्यांचे वडील सुभाष (भाऊ) पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ विटा नगरपरिषद हद्दीतील स्वमालकीची तीन एकर जागा या राष्ट्रकुल कुस्ती संकुलासाठी दिली. या तीन एकर विस्तीर्ण जागेत भारतातील हे पहिले कुस्ती संकुल उभे राहत असून त्याच्या प्रत्यक्ष कामालाही येत्या चार दिवसात सुरूवात होत आहे.या आखाड्यात एकाचवेळी ५०० मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी चार कुस्ती प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. मुलांच्या राहण्याची सोय आहे. मात्र, मुलांनी स्वत: जेवण तयार करण्याचे आहे. त्यांना दररोज लागणारा भाजीपाला उत्पादन करण्यासाठी आणखी तीन एकर जमिनीची व्यवस्था करण्यात आली आहे.या संकुलात जलतरण तलाव, सिन्थेटिक्स (रबरी) धावपट्टी, दुधासाठी १०० म्हैशींचा गोठा, लाल मातीचा आखाडा, दोन मॅट आखाडे, प्रशिक्षणार्थी मुलांसाठी पाच शालेय स्कूल बसेस यासह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Wrestlingकुस्तीSangliसांगली