‘चंदुकाका’च्या वेडिंग ज्वेलरी डेस्टिनेशनमुळे सांगलीचा नावलौकिक : राेहन चितळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST2021-03-15T04:24:48+5:302021-03-15T04:24:48+5:30
सांगली : ‘चंदुकाका सराफ यांचे वेडिंग ज्वेलरी डेस्टिनेशन दालन हे अप्रतिम दागिन्यांचा खजिनाच आहे. येथे वैविध्यपूर्ण डिझाइन्सचे सोने, हिऱ्याचे ...

‘चंदुकाका’च्या वेडिंग ज्वेलरी डेस्टिनेशनमुळे सांगलीचा नावलौकिक : राेहन चितळे
सांगली : ‘चंदुकाका सराफ यांचे वेडिंग ज्वेलरी डेस्टिनेशन दालन हे अप्रतिम दागिन्यांचा खजिनाच आहे. येथे वैविध्यपूर्ण डिझाइन्सचे सोने, हिऱ्याचे दागिने उपलब्ध आहेत. नेकलेस, गंठण, बांगड्या, लग्नाच्या इतर दागिन्यांची डिझाइन्स उपलब्ध असतील. यामुळे सांगलीच्या नावलौकिकात भर पडणार आहे,’ असा विश्वास चितळे डेअरीचे संचालक रोहन चितळे यांनी व्यक्त केला.
चंदुकाका सराफ यांच्या सांगली शाखेत साकारलेल्या वेडिंग ज्वेलरी डेस्टिनेशनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी किशोर लुल्ला, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपाताई पाटील-यड्रावकर, माजी नगराध्यक्षा माधुरी चौगुले, डॉ. राजेश फडे, डॉ. अजित पाटील, प्रकाश कुंभोजकर, डॉ. अनिकेत कुंभोजकर, डॉ. प्रियांका कुंभोजकर, चंदुकाका सराफचे संचालक अतुलकुमार शहा, सिद्धार्थ शहा, अंकिता शहा, सम्यक शहा उपस्थित होते.
सिद्धार्थ शहा म्हणाले, ‘नववधूंसाठी ब्रायडल पार्टीसाठी डिझाइन केलेल्या अनेक वैविध्यपूर्ण दागिन्यांची श्रेणी या दालनात उपलब्ध असेल. लग्नाच्या दागिन्यांची राजेशाही, श्रीमंतीची हमी देणारे दागिने पाहायला मिळणार आहेत. यामुळे लग्नाच्या दागिन्यांच्या खरेदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.’ (वा. प्र.)
--------------------------------------
फोटो: १४ चंदुकाका
सांगली येथील चंदुकाका सराफ यांच्या शाखेत वेडिंग ज्वेलरी डेस्टेनेशन दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी रोहन चितळे, किसोर लुल्ला, स्वरूपाताई पाटील, माधुरी चौगुले, डॉ. राजेश फडे, डॉ. अजित पाटील, अतुलकुमार शहा, सिद्धार्थ शहा, सम्यक शहा उपस्थित होते.