शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:57 IST

सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देअफवांवर विश्वास ठेवू नकापोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांचे आवाहन

सांगली : राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत.

लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पसरविण्यात येत आहेत. त्यातून धुळे, मालेगाव या भागात काही ंहिंसक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.केवळ संशयावरून कायदा हातात घेणे आणि निष्पाप व्यक्तींचा छळ करणे हा गुन्हा आहे. धुळे, मालेगाव या ठिकाणी संशयावरून हिंसक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची कोणतीही घटना जिल्ह्यात घडली नाही तसेच यापुढेही घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सर्तकतेचे निर्देश देण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नागरिकांनीही तथ्यहीन घटनांवर विश्वास ठेवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करून तसेच जनतेने अफवा पसरविणाऱ्यांबाबत सर्तक व संवेदनशिल राहावे व कोणताही अनुचित प्रकार समोर आल्यास त्वरित 100 नंबरवर संपर्क साधावा अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसSangliसांगली