शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले, वळसंग-सोरडी पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 13:38 IST

पाच तासांहून अधिक काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक जलमय झाले. पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

सांगली : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मिरज, जत, तासगाव, पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यांतही जोरदार सरी कोसळल्या. यापावसामुळे आज, शुक्रवारी सकाळी जत तालुक्यात वळसंग ते सोरडी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

सांगलीत दुपारी चारनंतर ढगांची दाटी झाली. सायंकाळी सव्वापाचपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाच तासांहून अधिक काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक जलमय झाले. पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे शुक्रवार, २० मे रोजीही जिल्ह्यात मोठ्या पावसाचा अंदाज आहे.

शिराळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वाळवा तालुक्यात सायंकाळी सहापासून पावसाची संततधार सुरू होती. दुष्काळी जत तालुक्यात दुपारी तासभर वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याचा पारा ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. रात्रीचे तापमानही २४ ते २७ अंशाच्या घरात गेले होते. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने तापमानात घट नोंदली आहे. कमाल तापमान अचानक ३१ अंशापर्यंत, तर किमान तापमान २४ अंशापर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे उकाडा गायब झाल्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला.

सांगलीच्या या भागात पाणी साचून

शहरातील उत्तर शिवाजीनगर, शिवाजी मंडई, मारुती रोड, राजवाडा परिसर, स्टेशन चौक, स्टँड परिसर, सिव्हिल हॉस्पिटल चौक या ठिकाणी पाणी साचून राहिले होते. गुंठेवारी भागातही पावसामुळे मोठी दलदल निर्माण झाली आहे. ड्रेनेजसाठी खोदलेले रस्तेही चिखलात रुतले आहेत.

मिरजेत वाहनधारकांचे हाल

मिरज शहरात बसस्थानक परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. सांगली, मिरजेतील क्रीडांगणावरही पाणी साचले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस