शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा नियोजन समिती बरखास्त, राज्य शासनाचे आदेश; समिती सदस्यांचा झाला हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:13 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील नवीन समिती करणार

सांगली : जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरविणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक दि. २ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, या बैठकीच्या तीन दिवस आधीच राज्य शासनाने जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती बैठकीला उपस्थिती लावून निधीचे आडाखे बांधणाऱ्या सदस्यांचा हिरमोड झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक दि. फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्याच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीवरील, तसेच कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या जात असल्याचे आदेश जारी केले आहेत.

चंद्रकांत पाटील नवीन समिती करणारजिल्ह्यातील विशेष निमंत्रित १२, विधिमंडळ सदस्य एक, नियोजनचे ज्ञान असलेले दोन आणि पाच निमंत्रित सदस्य अशा २० सदस्यांची नियुक्ती केली जाते. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून नवीन सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच करणार आहेत.सदस्यांच्या अशा होतात निवडीजिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती असते. जिल्हा नियोजन समितीवर विधानमंडळ किंवा संसद सदस्य यातून दोन, तर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले चार, विशेष निमंत्रित १४ अशा एकूण २० सदस्यांची नियुक्ती पालकमंत्री करतात. यामधून कार्यकारी समितीवर दोन नामनिर्देशित आणि दोन विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली जाते.

या सदस्यांच्या निवडी रद्दआमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, विशेष निमंत्रित सदस्य आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने, पोपट कांबळे, विनायक जाधव, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, जनसुराज्य शक्ती पार्टी युवकचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सुनील पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अतहर नायकवडी, बीरेंद्र थोरात यांच्यासह अन्य सदस्यांच्या निवडी रद्द झाल्या आहेत.

नियुक्तीसाठी इच्छुकांकडून 'लॉबिंग'जिल्हा नियोजन समितीवरील जुन्या सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय जारी होताच इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे. नियोजन समितीवर जाण्यासाठी काहींनी वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPlanning Commissionनियोजन आयोगchandrakant patilचंद्रकांत पाटीलguardian ministerपालक मंत्री