शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.५५ टक्के - : उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:27 IST

बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९२.५४ टक्के आहे. सर्वाधिक निकाल मिरज तालुक्याचा ९१.८० टक्के लागला, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी (८२.१७ टक्के) निकालाची नोंद

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत चार टक्क्याने घट; निकालाची प्रत मिळविण्यासाठी इंटरनेट कॅफेमध्ये गर्दी

सांगली : बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९२.५४ टक्के आहे. सर्वाधिक निकाल मिरज तालुक्याचा ९१.८० टक्के लागला, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी (८२.१७ टक्के) निकालाची नोंद झाली. विद्यार्थी आणि पालकांनी आॅनलाईन निकाल नेट कॅफेमध्ये व मोबाईलवरून पाहिला. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात चार टक्क्यांनी घट झाली आहे.

शिक्षण मंडळाने मंगळवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला. मागीलवर्षी सांगली जिल्ह्याचा निकाल ९०.१२ टक्के लागला होता. यंदा त्यामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यात ३७ हजार ७४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. ३६ हजार ७६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३० हजार ७४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ९ हजार ६४ विद्यार्थ्यांना प्रथम, तर १८ हजार ५९२ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली आहे.

जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक ९४.७४ टक्के, तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ७३.६९ टक्के लागला. वाणिज्य विभागाचा ९१.३२ टक्के निकाल लागला आहे. किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ८३.६२ टक्के निकालाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. यंदाही पुन्हा मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.पुनर्परीक्षार्थींचा निकाल २१.८९ टक्केजिल्ह्यातून बारावीसाठी एक हजार १५१ पुनर्परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकालाची टक्केवारी २१.८९ टक्के इतकी आहे. ९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर ३८ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. २०५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले.सतरा कनिष्ठ महाविद्यालये शंभरनंबरीजिल्ह्यातील १७ उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. त्यामध्ये व्ही. आर. लोणारी कॉलेज (दिघंची, ता. आटपाडी), सूर्योदय उच्च माध्यमिक विद्यालय (खोजानवाडी, ता. जत), केंब्रिज (मिरज), पोदार इंग्लिश स्कूल (सांगली), डॉ. पतंगराव कदम कनिष्ठ महाविद्यालय (कुंडल, ता. पलूस), क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय, रजपूत, कोठारी गुजराती कनिष्ठ महाविद्यालय (सांगली), न्यू इंग्लिश स्कूल (शिराळा), पंचक्रोशी हायस्कूल (बोरगाव, ता. कवठेमहांकाळ), दादोजी कोंडदेव सैनिक शाळा (तासगाव), सागर पाटील कनिष्ठ महाविद्यालय (ढवळी, ता. वाळवा), शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय (वाळवा), राजारामबापू पाटील कनिष्ठ महाविद्यालय (साखराळे, ता. वाळवा), के. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा) यांचा समावेश आहे.तालुकानिहाय निकालाची टक्केवारीतालुका परीक्षार्थी उत्तीर्ण गुण (टक्के)आटपाडी २११७ १७८० ८४.०४जत ४२११ ३६८९ ८७.६०कडेगाव १३१८ ११८३ ८९.७६क.महांकाळ १७६१ १४४७ ८२.१७खानापूर २५१८ २१६० ८५.७८मिरज २१३४ १९५९ ९१.८०पलूस २०३८ १८५८ ९१.१७सांगली ८८७३ ७४७८ ८४.२८शिराळा २०५१ १८०४ ८७.९६तासगाव २८७८ २५६८ ८८.२३वाळवा ५६१९ ४८१४ ८५.६७एकूण ३५५१८ ३०७४० ८६.५५जिल्ह्याचा शाखानिहाय निकालशाखा टक्केवारीविज्ञान ९४.७४कला ७३.६९वाणिज्य ९१.३२व्यावसायिक विषय ८३.६२

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालSangliसांगली