शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

अल्पवयीन मुलीस गैरकृत्यास भाग पाडणाऱ्या दोघांना दहा वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल

By शरद जाधव | Updated: March 1, 2023 17:47 IST

पीडित मुलीला आरोपी भोरे शिक्षणासाठी घरी घेऊन आली होती

सांगली : अल्पवयीन मुलीस मारहाण करून तिला गैरकृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शैला देवदासी भोरे (वय ४९, रा. काननवाडी, ता. मिरज) आणि रोहित हणमंत आसुदे (२५, रा. नागठाणे, ता. पलूस) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जादा सहजिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.पीडित मुलीला आरोपी भोरे शिक्षणासाठी घरी घेऊन आली होती. सुरुवातीला दोन महिने तिचा चांगला सांभाळ केल्यानंतर तिला भोरे मारहाण करू लागली. यानंतर जोगव्याच्या कार्यक्रमासाठी तिला नाचकाम, देवाची गाणी म्हणण्यास ती जबरदस्ती करत होती. काम करण्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाण केली जात असे.ऑक्टोबर २०१७ मध्ये भोरे हिने पीडितेला बुर्ली (ता. पलूस) येथे नेत आरोपी राेहित आसुदे याच्याशी तिची ओळख करून दिली.

यावेळी हा मुलगा आपल्या जोगव्याच्या फडामध्ये यायला पाहिजे, त्यासाठी तू त्याला भुरळ घाल, त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर, नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी भोरे हिने तिला दिली होती. यानंतर आरोपी आसुदे याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तिला काननवाडी येथे आणून पायाला बेडी बांधून, झोपडीच्या छताला लोखंडी सळईला उलटे लटकवून तिच्या अंगावर, गुप्तांगावर काठीने मारहाण करण्यात आली.११ जुलै २०१९ मध्ये आरोपी भोरे ही पीडितेला पंढरपूर येथे घेऊन गेली व तिथे वयस्कर माणसाशी तिला लग्न कर, त्याच्याकडून सोने, इतर वस्तू मागून घेे असे म्हणाली. याला तिने नकार दिला. यावर तिला तिथेच सोडून भोरे परत आली. अखेर भीक मागून पैसे गाेळा करून ती घरी आली. यावेळी पुन्हा तिला झाडाला बांधून काठीने निदर्यपणे मारहाण करण्यात आली. तेथून सुटका करून घेत तिने एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक ए. जे. उबाळे यांनी तपास केला.अखेर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावत ७५ हजार रुपयांचा दंडही केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय