शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
3
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
4
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
5
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
6
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
7
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
8
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
9
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
10
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
11
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

'ओटीएस'मधून सांगली जिल्हा बँक ५०० कोटी वसूल करणार - मानसिंगराव नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:38 IST

जिल्ह्यातील ४० हजारांवर सभासदांना होणार लाभ

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने थकबाकीदार शेतकरी, सहकारी संस्थांसाठी पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस ) लागू केली आहे. या योजनाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दहा हजारांवर थकबाकीदार शेतकरी तसेच ३५ ते ४० थकबाकीदार सहकारी संस्थांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बॅँकेने शेतकरी, सभासद संस्थांसाठी ओटीएस योजना जाहीर केली आहे. यापूर्वीही बॅँकेने सदर योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्या योजनेची मुदत संपल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा या योजनेची मागणी करण्यात आली. त्यानुसार बॅँकेने शेतकऱ्यांसाठी ' वसुली प्रोत्साहन निधी ' ही योजना आणली आहे. त्यातर्गत शेतकऱ्यांकडील अल्प, मध्यम व दीर्घ मुदत कर्जाचे ३० जून २०२१ पूर्वी थकीत असलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत.या योजनेत शेतकऱ्यांना दिलेल्या व्याजातील सूट, सवलतीपोटी विकास संस्थांना ५ टक्क्यांप्रमाणे वसुली प्रोत्साहन निधी जिल्हा बँक देणार आहे. थकबाकीदार सहकारी संस्थांसाठी जिल्हा बॅँकेने एकरकमी, सामोपचार (ओटीएस) परतफेड योजना आणली आहे. या योजेनेत मार्च २०२२ पूर्वीच्या थकबाकीदार संस्था, कंपनी व व्यक्तींना सहभाग घेता येणार आहे. बॅँकेने थकीत कर्जापोटी सरफेसी कायद्यातंर्गत विक्रीस काढलेल्या मालमत्ता बॅँकेने खरेदी केलेल्या असाव्यात.

ओटीएस योजनेचा कालावधी सहा महिन्यांचाओटीएस स्वीकारल्यापासून १५ दिवसांत तडजोड रक्कम भरणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्च २०२५ अखेरच्या एकूण व्याजापैकी २५ टक्के व्याजाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. ओटीएस योजनेचा कालावधी ६ महिन्यांचा आहे. या वेळेत कर्ज सहा हप्त्यांत परतफेड करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकेचा मदतीचा हातजिल्हा बॅँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी वसुली प्रोत्साहन निधी योजना आणली आहे. कर्जाचे हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेने यापूर्वी मदतीचा हात दिला होता. आता पुन्हा ही योजना सुरू करण्यात येत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजना लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले आहे.