सांगली जिल्हा बँकेची नोकरभरती लटकली

By Admin | Updated: September 12, 2016 00:21 IST2016-09-12T00:21:53+5:302016-09-12T00:21:53+5:30

प्रतीक्षा कायम : प्रक्रिया रेंगाळली

Sangli district bank staffers hang up | सांगली जिल्हा बँकेची नोकरभरती लटकली

सांगली जिल्हा बँकेची नोकरभरती लटकली

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील प्रस्तावित नोकर भरतीबाबत राज्यस्तरीय कृती समितीची (एसएलटीपी) बैठक होऊनही अद्याप कोणताही निर्णय होऊ शकला नाही. सहकार विभागाकडील प्रक्रिया रेंगाळल्याने भरतीची प्रक्रियाही लटकली आहे. कर्मचारी भरती प्रक्रियेला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा बँकेला लागली आहे.
जिल्हा बँकेचा १ हजार ४४२ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव यापूर्वी नाबार्ड व सहकार आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी होऊन त्याला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा जिल्हा बँक प्रशासनाला तसेच पदाधिकाऱ्यांना लागली असतानाच, पुन्हा नवे पत्र दाखल झाले होते. प्रत्येकवेळी काही तरी बदल होऊन येत असल्यामुळे नोकर भरती लांबणीवर पडली आहे. आता नव्या आकृतीबंधानुसार प्रस्ताव दाखल झाला असून, यासंदर्भात राज्य कृती समितीची बैठकही पार पडली. तरीही त्यापुढे प्रस्ताव गेलेला नाही. याबाबत बँकेचा पाठपुरावा सुरू असला तरी, सहकार विभागाकडे ही प्रक्रिया रेंगाळली आहे.
नोकर भरतीचा प्रश्न सोडविताना बॅँकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करण्यात येणार असून, त्यानुसार नोकर भरतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे नेमक्या किती जागांना मंजुरी मिळणार, याकडेही बॅँकेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संपूर्ण कामकाज नऊशे लोकांवर सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत बँकेचे कर्मचारी बळ अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे नोकरभरती झाली, तर कामाचा ताण कमी होऊन त्याचा बँकेच्या आर्थिक उलाढालीस फायदा होऊ शकतो.

Web Title: Sangli district bank staffers hang up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.