शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेची पुन्हा ओटीएस योजना; शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:02 IST

ही योजना राबविणारी जिल्हा बँक राज्यातील पहिली बँक

सांगली : नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने सलग तिसऱ्या वर्षी ओटीएस योजनेच्या माध्यमातून दिलासा देणार आहे. बँकेकडून थकबाकीदार शेतकरी व संस्थांसाठी ओटीएस योजना राबविली जाणार आहे. ही योजना राबविणारी जिल्हा बँक राज्यातील पहिली बँक आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. तसेच चालू आर्थिक वर्षात २२५ कोटी नफ्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँकेने मागील काही वर्षांत गतीने आर्थिक प्रगती केली आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केले असून, बँक आर्थिकदृष्ट्या अतिशय भक्कम आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा ओटीएस योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षे प्रभावीपणे योजनेची अंमलबजावणी झाली. अतिवृष्टी, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती तसेच शेती मालाला योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करून शकले नाहीत. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकेने स्वत:च्या नफ्यातून ओटीएस योजना राबविली. त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या थकित कर्जावरील व्याजाची सवलत दिल्याने बँकेची कर्जवसुली झाली.चालूवर्षी पुन्हा योजना सुरू करणार आहे. थकबाकीदार शेतकरी व संस्थांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. मागील योजनेत सुधारणा करून नवी योजना आणली जाईल. बँकेच्या नफ्यातून थकबाकीदार शेतकरी, संस्थांना ओटीएस देणारी सांगली जिल्हा बँक राज्यातील पहिली जिल्हा बँक आहे. बँकेच्या या योजनेची माहिती आता अन्य काही जिल्हा बँकांनी घेतली असून, तेथेही ही योजना लागू होणार आहे.

एनपीए शून्य टक्के करणारजिल्हा बँकेने मार्च २०२५ चे उद्दिष्ट ठेवून कर्जवसुली व व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मार्च २५ अखेर बँकेने २२५ कोटी रुपये नफ्याचे उद्दिष्ट आहे. तसेच ठेवींमध्ये एक हजार कोटींची वाढ करून नऊ हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला जाईल. कर्जपुरवठाही ८०० कोटींनी वाढवून सात हजार ५०० कोटींवर नेण्याचा प्रयत्न आहे. बँकेचा व्यवसाय १५ हजार कोटी रुपयांवर नेण्यात येईल. मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के करण्याचा प्रयत्न आहे, असेही मानसिंगराव नाईक म्हणाले.

रिझर्व्ह बँकेचे निकष पूर्णजिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व आर्थिक सक्षमता आणि गुणवत्तेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. येत्या काळात जिल्हा बँक राज्यातील पहिल्या पाच जिल्हा बँकांमध्ये असेल. बँकेने मोबाइल, नेट बँकिंगसह अन्य तांत्रिक सेवा सुरू करण्यासाठी आरबीआयला नाबार्डच्या मान्यतेने पुन्हा प्रस्ताव सादर करणार आहे. बँकेच्या नवीन दहा शाखांना मान्यतेचा प्रस्तावही रिझर्व्ह बँकेला सादर करणार आहे, असेही मानसिंगराव नाईक म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक