शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेची ६० कर्जदारांना जप्तीची नोटीस, साडेआठ कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:32 IST

बड्या थकबाकीदारांवरही होणार कारवाई

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मार्चएंड जवळ येत असल्याने थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. घर बांधणीसह शेतीचे दीर्घ मुदतीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने ६० कर्जदारांना आठ कोटी ३५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन ॲक्टअंतर्गत (सरफेसी कायद्यांतर्गत) नोटीस बजावली आहे.जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेती संस्थांना कर्जपुरवठा केला जातो. शेती कर्जाची वसुली नियमित असली तरी वैयक्तिक आणि बिगरशेती कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. बँक कर्ज वसुलीसाठी आता ॲक्शन मोडवर आली आहे. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०२५ अखेर बँकेने विक्रमी नफा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी थकबाकी वसुलीवर आता विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शेती कर्जाची नियमित वसुली सुरू आहे.मात्र, बिगरशेती कारणांसाठी केलेला कर्जपुरवठा मोठ्या प्रमाणात आहे. यात वैयक्तिक कर्जदारांसह सहकारी संस्था, उद्योजक, व्यावसायिक यांचा समावेश आहे. बँकेने घर बांधणी व अन्य कारणांसाठी वैयक्तिक कर्जपुरवठाही केला आहे. यातील ६० कर्जदारांचे तब्बल आठ कोटी ३५ लाख रुपये थकीत आहेत. या थकबाकीदारांकडील कर्ज वसुलीसाठी बँकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, संबंधित कर्जदारांची मालमत्ता सरफेसी कायद्यांतर्गत ताब्यात घेण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मुदतीत त्यांनी थकबाकी न भरल्यास या मालमत्तांची विक्री करून बँक कर्ज वसुली करणार आहे.

जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी बिगर शेती कर्जदारांकडील संस्थांची मालमत्ता सरफेसी कायद्यांतर्गत नेहमीच जप्त करत असते; पण आता बँकेने वैयक्तिक कर्जदारांवरही या कायद्यांतर्गत कारवाई करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बड्या थकबाकीदारांवरही होणार कारवाईजिल्हा बँकेने थकबाकीदारांची संख्या कमी करण्यासाठी वसुलीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बड्या थकबाकीदारांवरही कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. लवकरच संबंधित थकबाकीदारांना कायदेशीर नोटीस पाठवून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असेही बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक