शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
4
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
5
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
6
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
7
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
8
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
9
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
10
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
11
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
12
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
13
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
14
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
15
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
16
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
17
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
18
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
19
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
20
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

सांगली : डेक्कन सोसायटीने आधुनिक शिक्षणास प्राधान्य द्यावे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 2:13 PM

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आधुनिक शिक्षणास प्राधान्य द्यावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.

ठळक मुद्देडेक्कन सोसायटीने आधुनिक शिक्षणास प्राधान्य द्यावे : चंद्रकांत पाटीलविलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवास प्रारंभ

सांगली : आजच्या आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रातील बदलते संदर्भ लक्षात घेता पारंपारिक शिक्षणपध्दतीला फाटा देणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमधून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते मात्र, स्वत:च्या पायावर उभे करू शकणारे व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची आता वेळ आली आहे. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आधुनिक शिक्षणास प्राधान्य द्यावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव प्रारंभ कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर उपस्थित होते. यावेळी खा. संजय पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, आ. सुधीर गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटील पुढे म्हणाले की, डेक्कनसारख्या नावाजलेल्या संस्थेने आजवर अनेक नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. त्यामुळे आधुनिक काळातही समाजाला दिशा देण्याचे काम संस्थेने करावे. पारंपारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते हे खरे असलेतरी त्याचा त्यांना रोजगारासाठी, व्यवसाय उभारणीसाठी उपयोग होत नाही. हीच गरज ओळखून राज्य शासनाने कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाची स्थापना केली आहे.सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी कटीबध्द आहे मात्र, आरक्षण दिल्यामुळे समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे का याचाही विचार व्हायला हवा. यावर उपाय म्हणून महाविद्यालयामधूनच रोजगारांच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. विलिंग्डन महाविद्यालयाच्या विस्तारित अभ्यासक्रम व नवीन कोर्सेस सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रगतीची नवीन वाट देण्यात ह्यविलिंग्डनह्णचा फार मोठा वाटा आहे. या महाविद्यालयाने गुणवान विद्यार्थी व प्रतीभावान शिक्षक दिले आहेत. २१ शतकाचा विचार करता बदलते संदर्भ लक्षात घेऊन यापुढेही नवनवीन साधनांचा उपयोग करून कौशल्यावर आधारित आणि संशोधनावर आधारित शिक्षणाला प्राधान्य द्यावे. 

टॅग्स :Deccan Collegeडेक्कन कॉलेजSangliसांगली