शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत चुलत भावावर अ‍ॅसिड हल्ला,रेल्वेतून उतरताच पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:39 IST

भिलवडी (ता. पलूस) येथील सागर वावरे (वय ३०) या तरुणावर त्याच्या सख्ख्या चुलत भावानेच अ‍ॅसिड हल्ला केला. विश्रामबाग येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर अमोल वावरे हा पळून गेला आहे.

ठळक मुद्देसांगलीत चुलत भावावर अ‍ॅसिड हल्लारेल्वेतून उतरताच पाठलागविश्रामबाग स्थानकावरील घटना

सांगली : भिलवडी (ता. पलूस) येथील सागर वावरे (वय ३०) या तरुणावर त्याच्या सख्ख्या चुलत भावानेच अ‍ॅसिड हल्ला केला. विश्रामबाग येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर अमोल वावरे हा पळून गेला आहे.सागर वावरे हा सांगली-मिरज रस्त्यावरील भारती हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. दररोज तो रेल्वेने ये-जा करतो. शनिवारी सकाळी तो रेल्वेतून विश्रामबाग स्थानकावर उतरुन हॉस्पिटलकडे चालत निघाला होता.

तेवढ्यात समोरुन त्याचा चुलत भाऊ अमोल आला. त्याने काहीही न बोलता खिशातील अ‍ॅसिडची बाटली काढून सागरवर हल्ला केला.

पायावर, हातावर, पोटावर व गळ्यावर अ‍ॅसिड पडल्याने सागर गंभीर जखमी होऊन रस्त्यावर तडफडत पडला. नागरिकांनी सागरकडे धाव घेतली. तोपर्यंत अमोल पळून गेला. नागरिकांनी सागरला उपचारार्थ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सागरवर उपचार सुरु असल्याने पोलिसांना त्याचा अजून जबाब नोंदवून घेता आलेला नाही. त्यामुळे हल्ल्यामागील निश्चित कारण समजू शकले नाही. कौटूंबिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हाPoliceपोलिस