शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

सांगली महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, अंतिम रचना दोन मे रोजी प्रसिध्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 14:42 IST

सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना मंगळवारी सकाळी येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात जाहिर करण्यात आली.

ठळक मुद्देसांगली महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीरविद्यमान नगरसेवकांचे प्रभाग एकत्रअंतिम रचना दोन मे रोजी प्रसिध्द येणार

सांगली : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना मंगळवारी सकाळी येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात जाहिर करण्यात आली.यावेळी ओबीसी पुरूष आणि आणि महिलांसाठी राखीव प्रभाग आरक्षणासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये सोडत काढण्यात आली. या निवडणुकीसाठी प्रथमच चार नगरसेवकांचा एक प्रभाग निश्चित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार अंतिम प्रभाग रचना दोन मे रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत तसेच हरकती सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करून मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली, त्याला निवडणूक आयोगाने १३ मार्च रोजीच मान्यता दिली आहे.सोडतीदरम्यान, आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभाग निहाय काढल्या जाणाऱ्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आले होते. आरक्षण पध्दत लगेच लाईव्ह दाखविण्यात येत होते. ही सर्व प्रक्रिया आॅन कॅमेरा सुरु होती.अंतिम रचना २ मे रोजीदि. २0 मार्च रोजी प्रारूप आराखडा जाहीर करून नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाठी सोडत काढणे, २३ मार्च प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर करणे, २३ मार्च ते चार एप्रिल प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेणे, १६ एप्रिल रोजी हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे, २३ एप्रिल पर्यंत प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, २७ एप्रिल निर्णय देणे, दोन मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.अशी आहे प्रभाग रचनाया महापालिकेसाठी प्रभागाची सुरूवात कुपवाडपासून होते. कुपवाड- मिरज - सांगली अशी ही रचना असून गतवेळीइतकीच यंदाची नगरसेवकांची संख्याही ७८ इतकीच राहणार आहे. सर्वसाधारण गटासाठी ४५ जागा निश्चित केल्या असून सर्व साधारण पुरूष गटासाठी २२, ओबीसी महिलांसाठी २१, त्यापैकी ११ महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवल्या आहेत.विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग एकत्र करण्यात आले आहेत. महापौर- राजेश नाईक, नायकवडी- बागवान, उपमहापौर घाडगे, प्रशांत पाटील, धनपाल खोत एकत्र यांचा समावेश त्यात आहे. सांगलीवाडी व मिरजेतील उत्तमनगर प्रभाग ३ सदस्यीय करण्यात आले आहेत. तीन सदस्यीय प्रभाग हा १७ ते २० हजार संख्येचा तर चार सदस्यीय प्रभाग २५ ते २८ हजार संख्येचा राहणार आहे.प्रभाग क्रमांक - १अ- अनुसूचित जाती , ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - २अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - ३अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष , क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - ४अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - ५अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला, ड--सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - ६अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - ७अ-अनुसूचित जाती , ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - ८अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - ९अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - १0अ-अनुसूचित जाती , ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड--सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक -११अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - १२अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - १३अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण पुरूष,प्रभाग क्रमांक - १४अ-अनुसूचित जाती, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - १५अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड--सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - १६अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - १७अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - १८अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड-सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - १९अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड - सर्वसाधारण पुरूषप्रभाग क्रमांक - २0अ- अनुसूचित जाती, ब-अनुसूचित जमाती महिला, क-सर्वसाधारण महिला,

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली