सांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान, दोन तासानंतर आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:40 PM2018-03-19T14:40:40+5:302018-03-19T14:40:40+5:30

सांगलीवाडीतील शिवकुमार केवट यांच्या पुठ्ठा व प्लॅस्टिकच्या गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत जुना पुठ्ठा व प्लॅस्टिकचे साहित्य जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Fire broke out in Sangliwadi due to heavy fire, loss of millions, fire after two hours | सांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान, दोन तासानंतर आग आटोक्यात

सांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान, दोन तासानंतर आग आटोक्यात

Next
ठळक मुद्देसांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला भीषण आगलाखोंचे नुकसान, दोन तासानंतर आग आटोक्यात

सांगली : सांगलीवाडीतील शिवकुमार केवट यांच्या पुठ्ठा व प्लॅस्टिकच्या गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत जुना पुठ्ठा व प्लॅस्टिकचे साहित्य जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.



उत्तरप्रदेश येथील शिवकुमार केवट आणि त्यांचे बंधू रामअवतार केवट यांचे सांगलीवाडी येथे पुठ्ठा आणि प्लॅस्टिकचे गोडावून आहे. सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या गोदामातून धुराचे लोट येत असल्याचे शेजाऱ्यांना लक्षात आले. त्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते.

शिवकुमार यांच्या गोदामातील लोखंडी अ‍ॅगल, पत्रे वितळले होते. गोदामाशेजारी मधुकर हसबे यांच्या घरालाही आगीची झळ लागली. त्यांच्या घरावरील पाण्याची टाकी जळून खाक झाली. पाण्याच्या कनेक्शनच्या पाईपही जळून खाक झाल्या. खिडकीच्या काचाही फुटल्या.

रामअवतार यांच्या तळमजल्यावरील प्लॅस्टिकच्या गोदामातही आग पसरली. प्लॅस्टिकचे सर्व साहित्य जळाले आहे. रामअवतार दुसऱ्या मजल्यावर राहतात. तिथेपर्यंत आग पसरली गेल्याने भिंती काळवंडल्या आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या सहा गाड्या लागल्या.

दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय आहे. शहर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. नुकसानीचा आकडा स्पष्ट झालेला नाही. पण लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शिवकुमार व रामअवतार केवट यांनी सांगितले.

Web Title: Fire broke out in Sangliwadi due to heavy fire, loss of millions, fire after two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.