शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीला सारे मिळून ‘स्मार्ट सिटी’ बनवा - चव्हाण; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:02 IST

सांगलीच्या विकासासाठीच भाजपमध्ये : पृथ्वीराज पाटील

सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला पाठबळ देतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत व्यक्त केला.काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा मुंबईत सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपत प्रवेश झाला. त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आदींसह भाजपचे नेते उपस्थित होते.रवींद्र चव्हाण म्हणाले, पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करीत आले आहेत. सहकार क्षेत्रातील काम लक्षवेधी राहिले आहे. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला त्यांचे नक्की भले होईल. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही.चंद्रकांत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत. ते मनाने कधीच भाजपचे झाले होते, आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे.यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम थोपटे आदी उपस्थित होते. पाटील यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला.सांगलीच्या विकासासाठीच भाजपमध्ये : पृथ्वीराज पाटीलपृथ्वीराज पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षात अत्यंत जबाबदारीची पदे भूषविली. मीदेखील अनेक वर्षे विकासाचे धोरण घेऊन राजकारणात काम करतोय. दोन विधानसभा निवडणुका एक व्हिजन घेऊन लढवल्या. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. विकासाची पंचसूत्री मी तयार केली होती. ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. विकासाच्या मुद्द्यावर मी भाजपत येत असल्याचे त्यांना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीच्या विकासाला बळ द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.