शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

सांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज समन्वयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 18:59 IST

पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्'ातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे.

ठळक मुद्देप्रदेश कार्यकारिणीलाही चिंता

अविनाश कोळीसांगली : पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्तील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. वाढती गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वहीन झालेल्या सांगलीतील काँग्रेसच्या वाटचालीबद्दल प्रदेश कार्यकारिणीतही चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगली काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव, गोंधळ व गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व आता नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नेत्यांनी मान्य केले होते. समन्वयाची तात्पुरती जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांवर सोपविण्यात आली आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या जिल्'ात भाजपने याच परिस्थितीचा फायदा घेत मुसंडी मारली आहे.

खासदार तसेच सर्वाधिक चार आमदार असलेला भाजप आता ताकद विस्तारण्यात दंग आहे. दुसरीकडे भाजपला टक्कर देण्याची तयारी करण्यापेक्षा, काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले. त्यामुळे गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जेवढी ताकद काँग्रेसकडे होती, त्यातील निम्मी ताकदही आता राहिलेली नाही. सक्षम नेतृत्वाचा अभाव आणि गटबाजीला आलेले उधाण काँग्रेसची ताकद कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

कार्यकर्त्यांच्या बाबतीत काँग्रेस अन्य पक्षांच्या तुलनेत मजबूत दिसत असला तरी, नेत्यांमधील गटबाजीमुळे त्यांचे सैन्य खचले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांना चिंता वाटत आहे.मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील यशानंतर काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि मनातही उत्साहाच्या लाटा दिसून आल्या. पण दुसरीकडे धुमसणारी गटबाजीही तितक्याच तीव्रतेने या लाटांवर स्वार होताना दिसून आली.

मदन पाटील, पतंगराव कदम यांच्या काळातही गटबाजी होती, मात्र सर्व गटांना ऐन निवडणुकीत पंखाखाली घेत ताकदीने लढत देण्याचे त्यांच्यात कसबही होते. आता तसा प्रयत्न करणारा किंवा तशी ताकद असलेला एकही नेता काँगे्रसकडे नाही. भाजपला टक्कर देताना काँग्रेसला आता स्वत:चे घर प्रथम दुरुस्त करावे लागणार आहे.गटबाजी उजेडात, मार्ग सापडेनाआॅगस्टमध्ये काँग्रेसच्या सांगलीतील संघर्ष यात्रेत प्रदेशच्या दिग्गज नेत्यांसमोर गटबाजी दिसून आली. शहरात लावलेल्या फलकांवरही पक्षाचे नेते, पदाधिकारी गटबाजीमुळे विभागले गेले होते. यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोट ठेवले होते. त्यापूर्वीही विधानपरिषद निवडणूक, महापालिका निवडणूक यामध्येही गटबाजी दिसून आली. वरिष्ठ नेत्यांना या गोष्टी कळूनही, त्यांना मार्ग सापडत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीcongressकाँग्रेस