शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : तासगावच्या मारामारीस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे का? : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 13:34 IST

तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देतासगावच्या मारामारीस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे का? : तटकरे शासनपुरस्कृत गुंडगिरीचे राज्यभर दर्शन

सांगली : तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.ते म्हणाले की, शासनपुरस्कृत गुंडगिरीचे दर्शन आता राज्यभर घडू लागले आहे. तासगावमधील प्रकार कसा घडला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई का केली नाही, त्यांचा या प्रकाराला आशिर्वाद होता का, असे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

जत येथील सभेतही आम्हाला खासदार, आमदारांच्या गुंडगिरीबद्दल जनतेमधून रोष दिसून आला. जनता या सर्व गोष्टी बघत आहे. त्यामुळे योग्यवेळी भाजपला त्यांची जागा जनताच दाखवून देईल. सरकारचा हस्तक्षेप सर्वच क्षेत्रात सुरू झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाचेही नियम त्यांनी हवे तसे बदलले. कर्नाटकमधील निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदर कळाला होता. त्यामुळे ईव्हीएम मशिनच्या माध्यमातूनही ते निवडणुका जिंकू पहात आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या काळात बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांमागे चौकशा लावल्या जातात, ही गोष्ट आता नवी राहिली नाही. आमच्या पक्षाच्या मागे सिंचन घोटाळ््याची चौकशी लावली आहे. बऱ्याच गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत. शिवसेनेलाही ते अशाच पद्धतीने धमकावत आहेत.नालायकांमध्ये शिवसेनेचे १२ मंत्रीअंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू केल्यानंतर विरोधकांनी त्यावर टीका केली. शिवसेनेने विरोधाची औपचारिकता दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांकडे डोळे वठारून पाहिल्यानंतर ते मंत्री मौन बाळगून खाली बसले.

शिवसेनेचे हे दुटप्पी धोरण आता सर्वांनाच कळाले आहे. शिवसेना सरकारला नेहमीच नालायक म्हणते, पण याच नालायकांमध्ये यांचे १२ मंत्री आहेत, याचे भान त्यांना दिसत नाही.जातीय दंगलीची चिन्हे!विविध जाती-धर्मांच्या लोकांमध्ये विष पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. निवडणुका अशा जातीय दंगलींच्या बळावर लढविल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनीच याविषयी सतर्कता बाळगावी, असे मत सुनील तटकरे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस