शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सांगली : हवामानाच्या लहरीपणाने नागरिक हैराण, पारा १२ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:15 IST

कधी उकाडा, कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अशा हवामानाच्या लहरीपणाचा फटका सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देहवामानाच्या लहरीपणाने नागरिक हैराण, पारा १२ अंशावर झपाट्याने होताहेत बदल, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

सांगली : कधी उकाडा, कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अशा हवामानाच्या लहरीपणाचा फटका सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना बसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उकाडा अनुभवणाऱ्या सांगलीकरांना मंगळवारपासून कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अचानक किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.सोमवारी जिल्ह्याचे सरासरी किमान तापमान १७ अंश व कमाल तापमान ३१ अंश होते. मंगळवारी सकाळी अचानक ५ अंशाने तापमान खाली उतरत १२ अंश सेल्सिअस झाले. कमाल तापमानात फारसा फरक पडला नसला तरी सकाळपासून अचानक बोचऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या दहा वर्षाच्या हवामानाचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक लहरीपणा या वर्षातच अनुभवास येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे. रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लहान मुले आणि वयोवृद्धांच्या आरोग्याला हवामानाचा हा लहरीपणा कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या काही दिवसात तापमानात आणखी घट होणार आहे. १२ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान आता १३ व १४ डिसेंबर रोजी ११ अंशापर्यंत तर १५ डिसेंबरनंतर १0 अंशापर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे.

सरासरी कमाल तापमानही २९ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी, रात्री आणि दुपारच्या वेळीही थंडी लोकांना जाणवणार आहे. त्यामुळे लोकांना आता उबदार कपड्याचा आधार घ्यावा लागणार आहे. सांगली जिल्ह्यातील हवामानाचा हा लहरीपणा आणखी बरेच रंग या पंधरवड्यात दाखविण्याची चिन्हे आहेत.हलक्या पावसाची चिन्हेसांगली जिल्ह्याच्या काही भागात १४ व १५ डिसेंबर रोजी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवशी हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. वातावरण ढगाळ राहिले तरी तापमानात काही फरक पडणार नसल्याचेही या विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :weatherहवामानSangliसांगली