सांगली चेंबर आॅफ कॉमर्सची निवडणूक बिनविरोध
By Admin | Updated: August 14, 2015 00:04 IST2015-08-13T23:20:43+5:302015-08-14T00:04:20+5:30
त्रैवार्षिक निवडणूक : तेराजणांची माघार; ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

सांगली चेंबर आॅफ कॉमर्सची निवडणूक बिनविरोध
सांगली : येथील व्यापाऱ्यांची संस्था असलेल्या चेंबर आॅफ कॉमर्सची निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज माघारीचा गुरुवारी अंतिम दिवस होता. यावेळी तेराच अर्ज शिल्लक राहिल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सनतकुमार आरवाडे यांनी जाहीर केले. चेंबर आॅफ कॉमर्सच्या तेरा संचालक मंडळासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. तेरा जागांसाठी एकूण २६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील तेरा जणांनी माघार घेतल्याने, उर्वरित तेरा जणांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये रमणिक वृजदास दावडा, अण्णासाहेब बळवंत चौधरी, श्रीशैल बसगोंडा पारगोंड, प्रशांत बाळासाहेब पाटील, हरिश्चंद्र सिदू पाटील, समीर शिवलिंग साखरे, सतीश रतिलाल पटेल, विजय कुबेर निरवाणे, श्रीगोपाळ मांगीलाल मर्दा, दीपक नाभिराज चौगुले, शरद जयंतीलाल शहा, सचिन सुरेश घेवारे, अमरसिंह अण्णासाहेब देसाई यांचा समावेश आहे. अर्ज माघारीचा आज अंतिम दिवस असल्यामुळे ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. रिंगणातील सर्व उमेदवारांनी यासाठी आपली संमती दर्शवली. निवडणूक मंडळाचे सदस्य सनतकुमार आरवाडे, जयंतीलाल शहा, रामभाऊ अडगोळ यांच्याकडे सर्वच उमेदवारांनी आपापल्या उमेदवारी माघारीचे अर्ज दिले. त्यानंतर निवडणूक मंडळ व रिंगणातील सर्वच उमेदवारांची चेंबर आॅफ कॉमर्समध्ये बैठक झाली. यामध्ये तेरा जणांची नावे संचालक मंडळासाठी निश्चित करण्यात आली. नव्या संचालक मंडळाचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. (प्रतिनिधी)
इच्छुकांच्या अनेकांमध्ये नाराजी
संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. विकास मोहिते, अभय मगदूम, सुनील पट्टणशेट्टी, बी. एल. पाटील आदींनी उमेदवारी दाखल केली होती. बैठकीमध्ये ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. यामध्ये तेरा जणांची नावे वगळण्यात आली.