शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गुंठाभर जागेच्या वादातून महिलेची निर्घृण हत्या, धारधार हत्याराने केले २० वार, ५ संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 21:48 IST

Sangli: सांगली : शहरातील वानलेवाडी परिसरात घरजागेच्या वादातून कोयत्यासह धारदार शस्त्राने वीस वार करून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला.

सांगली : शहरातील वानलेवाडी परिसरात घरजागेच्या वादातून कोयत्यासह धारदार शस्त्राने वीस वार करून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. संगीता राजाराम मासाळ (वय ५०, रा. गल्ली क्रमांक ८, वानलेसवाडी, सांगली), असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह शिवाजी बाळू मासाळ, लक्ष्मी बाळू मासाळ (सर्व रा. वानलेसवाडी) या माय-लेकांना ताब्यात घेतले आहे. विश्रामबाग पोलिसांत घटनेची नोंद असून, रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत संगीता व संशयित हे एकमेकांच्या भावकीतील आहेत. संगीता यांचे पती राजाराम मासाळ यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी राजाराम मासाळ यांच्यासह त्यांचे भाऊ चंद्रकांत, शिवाजी आणि बाळू या चौघांनी मिळून वानलेसवाडी येथे आठ गुंठे जागा खरेदी केली होती. त्या जागेपैकी चंद्रकांत मासाळ यांच्या नावावरील एक गुंठे जागा २००१ मध्ये राजाराम यांना विकली होती. त्यानंतर ही जागा परत मागण्यात आल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला होता.

२०११ मध्ये राजाराम यांचा मृत्यू झाल्यानंतर मृत संगीता यांनी ही जागा अन्य एकाला विकली. त्या व्यक्तीने बांधकाम सुरू केल्यानंतर चंद्रकांत यांनी न्यायालयात धाव घेत २०१५ मध्ये बांधकामास स्थगिती मिळवली होती. चंद्रकांत यांचा सांभाळ करू, पण ही जागा परत घ्या यासाठी संशयित लक्ष्मी हिने तगादा लावला होता. यावरून मृत संगीता आणि संशयितांमध्ये वारंवार वादावादी होत होती.

रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास संगीता घरी जेवण करत बसल्या असताना, संशयित घरात घुसले व त्यांनी वादावादी सुरू करत कोयता व अन्य धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केले. तब्बल वीस वार करण्यात आल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मृत संगीता यांचे भाऊ रावसाहेब गणपती गडदे (रा. गल्ली क्रमांक ९, गजराज कॉलनी, वानलेसवाडी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

संशयितांची हत्यारे नाचवित दहशतसंशयितांचा मृत संगिता यांच्यासोबत जागेच्या वाद सुरू होता. यातून त्यांच्यात वारंवार वादावादी होत होती. रविवारी दुपारी संशयितांनी संगिता यांच्या घरात घुसून त्यांचा खून केल्यानंतर मदतीला कोणी येवू नये म्हणून संशयितांनी हातातील धारदार हत्यारे नाचवून दहशत माजवत तिथून पळ काढला. एक गुंठे जागेवरून प्रकारमृत संगिता व संशयितांमध्ये जागेवरून वाद सुरू होता. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. संशयित हे मृत संगिता यांचा पुतण्या तर महिला जावू आहे. तरीही त्यांच्यात वाद होत असत. याच वादाचे पर्यावसन रविवारी खूनात झाले. केवळ एक गुंठे जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली