शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भाजपचे महापालिकेसमोर चटणी-भाकर आंदोलन

By अविनाश कोळी | Updated: June 24, 2024 18:06 IST

चक्काजामचा इशारा: घंटागाडी चालकांची लूट केल्याप्रकरणी निदर्शने

सांगली : महापालिकेच्या घंटागाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या खासगी कंत्राटी कामगारांची ठेकेदाराकडून लूट केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने महापालिकेसमोर चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले.मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.सकाळी साडे अकरा वाजता कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धडक मारली. याठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर चटणी, भाकरी खाऊन कामगारांच्या पिळवणुकीबद्दल निषेध व्यक्त केला.

यावेळी पृथ्वीराज पवार म्हणाले की, घंटागाडीवर चालकांचा पुरवठा करणाऱ्या आदम्स कंपनीचा व्यवहार अत्यंत बेकायदेशीर आहे. वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या कामगारांची अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही त्यांच्याकडून दरमहा ५००० रुपये पगारातून काढून घेतले जात आहे. त्यांची कष्टाची भाकरी हिसकावून घेण्याचा हा प्रकार सुरु आहे. ज्यांनी पैसै देण्यास विरोध केला, त्यांना महापालिका प्रशासनाच्या मंजुरीविना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात आले.पवार म्हणाले की, वाहन चालक पुरवणाऱ्या आदम्स एंटरप्राईजेस या कंपनीने २०२२ पासून ९ वर्षासाठी महापालिकेच्या घंटागाडीवर वाहन चालक पुरविण्याचा ठेका मिळविला. त्यांनी सुमारे शंभर वाहन चालक विविध विभागाकरिता पुरविले. चालकांची नियुक्ती करताना प्रत्येक वाहन चालकाकडून ३० हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरून घेतली. अवास्तव ५० हजार ते दीड लाख रुपये महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन घेण्यात येत आहेत. काही वाहन चालकांनी ही रक्कम भरली. ज्यांची पैसे देण्याची ऐपत नाही त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करीत आहोत.

करमुक्त पार्किंग जागेचे उद्घाटनमहापालिकेने पार्किंगच्या जागांना कर लावल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आंदोलकांनी महापालिकेच्या पार्किंग आवाराचे करमुक्त जागा म्हणून प्रतिकात्मक उद्घाटन केले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाagitationआंदोलन