शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी सांगलीतील समाजकल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 14:07 IST

जिल्हा परिषदेत द्यावी लागणार हजेरी 

सांगली : बचत गटाने घेतलेल्या निविदेचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उषा संपत उबाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी समाजकल्याण आयुक्तांनी उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच सांगलीजिल्हा परिषदेत रोज हजेरी लावण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.तक्रारदार यांचा बचत गट आहे. या बचत गटाने समाज कल्याण विभागाकडील एक निविदा घेतली होती. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजूर केल्याच्या मोबादल्यात सहायक आयुक्त उबाळे यांनी त्यांच्याकडे १० टक्क्यांनुसार लाच मागितली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.१६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता बचत गटाचे आठ लाख १२ हजार रुपये बिल मंजूर केल्याबद्दल १० टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती पाच टक्क्यांप्रमाणे ४० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.उबाळे यांनी ही रक्कम दि.१७ एप्रिल रोजी घेऊन येण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त उबाळे यांच्या कक्षाजवळ सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर उबाळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार समाजकल्याण आयुक्तांनी नितीन उबाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, तसेच रोज जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.

बडे मासे गळाला कधी लागणार?जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयामधील काही विभागांमध्ये गैरव्यवहार होत आहेत. लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्या विभागातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी असूनही हे बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला कधी लागणार, अशी चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी रंगली होती.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणzpजिल्हा परिषद