शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फडणवीसांच्या दौऱ्यांत कोंबड्या सोडणाऱ्यां स्वाभीमानी कार्यकर्त्यांची सांगलीत धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:30 IST

Swabimani Shetkari Sanghatna Sangli- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात कडकनाथ कोंबड्या सोडू पाहणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड केली. पकडून पोलीस ठाण्यात नेले. कार्यकर्त्यांनी पोलीसांवरच कोंबड्या उधळल्या.

ठळक मुद्देफडणवीसांच्या दौऱ्यात कोंबड्या सोडणाऱ्या स्वाभीमानी कार्यकर्त्यांची सांगलीत धरपकडसोबत आणलेल्या कडकनाथ कोंबड्या हिसकावण्याचा प्रयत्न

सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात कडकनाथ कोंबड्या सोडू पाहणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड केली. पकडून पोलीस ठाण्यात नेले. कार्यकर्त्यांनी पोलीसांवरच कोंबड्या उधळल्या.माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची सांगता इस्लामपुरातील गांधी चौकात रविवारी होती. यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यांवर येणार होते. त्यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्यासाठी कडकनाथ संघर्ष यात्राही आयोजित केली होती.

सदाभाऊ खोत यांनी आत्मनिर्भर यात्रेदरम्यान स्वाभीमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावरही जोरदार टिका केली होती. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ संघर्ष यात्रा आयोजित केली. या पार्श्वभूमीवर शहर पोलीसांनी दुपारी सांगलीत स्टेशन चौकात कार्यकर्त्यांची धरपकड केली.

इस्लामपुरकडे कूच करु पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची नाकेबंदी केली. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी सभेत उधळण्यासाठी सोबत आणलेल्या कडकनाथ कोंबड्या हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, त्या पोलिसांवरच उधळल्या. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांची झटापटही झाली. पंचवीसभर कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगली