शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी

By घनशाम नवाथे | Updated: July 6, 2024 20:35 IST

Sangli Accident News: सांगली येथील कर्मवीर चौकाजवळ रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका कंपनीच्या आरामबसमध्ये वटवाघूळ शिरल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कठड्यावर आणि लोखंडी जाळीवर एका बाजूने कलंडली.

- घनशाम नवाथेसांगली : येथील कर्मवीर चौकाजवळ रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका कंपनीच्या आरामबसमध्ये वटवाघूळ शिरल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कठड्यावर आणि लोखंडी जाळीवर एका बाजूने कलंडली. तसेच बसची धडक बसून झाड तुटून पडले. अपघातात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. चालकासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.

अशोका ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस (एमएच ०९ जीजे ५४५४) ही रात्री सांगलीतून मुंबईकडे निघाली होती. विश्रामबागहून सांगलीकडे येताना कर्मवीर चौकाजवळ जिल्हा बॅंकेपासून काही अंतरावर अचानक चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसले. चालकाच्या हाताला ते चिटकल्यामुळे हात झटकला. या प्रयत्नात चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. बस उजव्या बाजूला रस्ता सोडून ओघळीमध्ये गेली. ओघळीला लागून असलेल्या बागेच्या कठड्याला आणि लोखंडी जाळीला घासत काही अंतर पुढे गेली. तेव्हा समोर गुलमोहोराच्या झाडाला जोराने धडकली. तेव्हा बस जागेवर थांबली. धडकेत झाड तुटून पडले. तर चालकाच्या केबिनसमोरील काचेचा चक्काचूर झाला. केबिनच्या खालील बाजूचे नुकसान झाले.

अपघातानंतर आतील प्रवाशांनी आरडाओरड केला. शेजारून जाणारे वाहनधारक आणि सर्व्हीस रस्त्याशेजारी राहणारे नागरिक घटनास्थळी धावले. तत्काळ आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. एक-दोन प्रवासी जखमी झाले. तर उर्वरीत किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच सुखरूप असलेल्या प्रवाशांंना अन्य बसेसमधून मुंबईकडे रवाना केले. तर चालकासह जखमी प्रवाशांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीनंतर झाडाच्या फांद्या तोडून काढण्यात आल्या. त्यानंतर बस बाहेर रस्त्यावर आणली. अपघातप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात कच्ची नोंद करण्यात आली आहे.

रस्ता धोकादायकमार्केट यार्ड ते कर्मवीर चौकापर्यंत अनेक वाहन धारक वेगाने येतात. याठिकाणी रस्ता थोडा अरूंद आहे. सिग्नल पडण्यापूर्वी पुढे जाण्यासाठी म्हणून दिवसा अनेकजण वेगाने येत असल्याचे चित्र दिसून येते. सात वर्षापूर्वी येथे मोठा अपघात झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली