शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीप्रमाणे कुपवाड, मिरजेत ‘फिश’ मार्केटला मंजुरी देणार; मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:18 IST

सांगलीत अद्ययावत फिश मार्केटचे भूमिपूजन

सांगली : सांगलीत उभ्या राहणाऱ्या फिश मार्केटमध्ये दुसऱ्या मजल्यावर कोल्ड स्टोअरेज निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवा. तसेच कुपवाड आणि मिरजेला देखील फिश मार्केट होण्यासाठी प्रस्ताव सादर करा. त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी येथे दिली.महापालिकेच्यावतीने खणभाग येथे अद्ययावत फिश मार्केटचे भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार विशाल पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे, नीता केळकर, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.राणे म्हणाले, सांगलीत अद्ययावत फिश मार्केट उभे राहण्यासाठी ॲड. स्वाती शिंदे यांचा पाठपुरावा सुरू होता. या फिश मार्केटवर आणखी एक मजला कोल्ड स्टोअरेजसाठी उभारण्याची मागणी येथे केली. त्यासाठी प्रस्ताव पाठवावा, त्याला परवानगी दिली जाईल. आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात आणखी दोन ठिकाणी फिश मार्केट उभारण्याची मागणी केली आहे. त्याचाही प्रस्ताव लवकर पाठवा. तो देखील मंजूर करण्याचा शब्द देतो.ते पुढे म्हणाले, बऱ्याच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर येथे फिश मार्केट उभे राहत आहे. ते दर्जेदार आणि चांगले कसे होईल, याकडे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. दर्जाच्या बाबतीत कोणतीच तडजोड करू नका. आम्ही देखील निकृष्ट काम सहन करणार नाही. तसेच मार्केटमधील विक्रेत्यांनी बाहेर कोणी विक्री करणार नाही, याची दक्षता घ्यावी. मार्केटला शिस्त आणावी.खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगलीतील फिश मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून भोई-मुस्लिम बांधव खेळीमेळीने व्यवसाय करत आहेत. या मार्केटसाठी केंद्राचा निधी मिळाला आहे. निधी कमी पडला तरी आणखी निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. खासदार निधीतूनही मदत केली जाईल. प्रकल्प चांगला होण्यासाठी प्रयत्न करू.आयुक्त गुप्ता म्हणाले, या फिश मार्केटमध्ये आणखी एक मजला वाढवून मिळाल्यास तेथे कोल्ड स्टोअरेज करता येईल. त्यासाठी शब्द देऊन प्रस्ताव पाठवण्यास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे. महापालिका क्षेत्रात मिरज आणि कुपवाडमध्येही फिश मार्केटला मंजुरी मिळावी.ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या, सांगलीत जुन्या मार्केटच्या जागी नवीन फिश मार्केट व्हावे, यासाठी गेली २० वर्षे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला केंद्रातून मंजुरी मिळाली आहे. यावेळी भाजप नेते सम्राट महाडिक, माजी नगरसेविका सुनंदा राऊत, उर्मिला बेलवलकर, गीतांजली ढोपे-पाटील, निरंजन आवटी, मयूर पाटील, सद्दाम मकानदार आदींसह मत्स्य विभागाचे अधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते. शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी आभार मानले.

अद्ययावत मार्केटमध्ये ८१ गाळेअतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ म्हणाले, येथे अद्ययावत फिश मार्केटमध्ये ३ बाय ३ मीटरचे ८१ गाळे उभारले जातील. स्वतंत्र डिस्पोजल युनिट असेल. प्रत्येकाला स्वतंत्र नळ कनेक्शन असेल. स्वच्छतागृह असेल.

कत्तलखाने बंद करामंत्री नितेश राणे महापालिका आयुक्त गुप्ता यांना उद्देशून म्हणाले, महापालिका क्षेत्रात दोन कत्तलखाने असल्याची माहिती मला मिळाली आहे. गोवंश हत्या कायदा राज्यात लागू आहे. त्यामुळे नागरिक आणि हिंदू म्हणून सांगतो, येथील कत्तलखाने बंद झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत ते सुरू राहता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजारNitesh Raneनीतेश राणे