सांगली आकाशवाणीला महापुराच्या नुकसानीपोटी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:42+5:302021-01-20T04:26:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत सांगली आकाशवाणीला पुरामुळे झालेल्या पडझडीच्या दुरुस्तीसाठी ४० लाखांचा निधी ...

सांगली आकाशवाणीला महापुराच्या नुकसानीपोटी निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत सांगली आकाशवाणीला पुरामुळे झालेल्या पडझडीच्या दुरुस्तीसाठी ४० लाखांचा निधी मिळाला उर्वरित कामांसाठीही निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करू, अशी माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिली.
त्या म्हणाल्या, महापुरात सांगली आकाशवाणी केंद्रांमध्ये सात ते आठ फूट पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. पाच स्टुडिओ असलेले पश्चिम महाराष्ट्रातले सांगली आकाशवाणी हे केंद्र एकमेव आहे. पुरानंतर कोरोना काळात आकाशवाणीच्या नुकसानीकडे कोणाचे लक्ष गेले नाही. याबाबत मी दिल्लीला जाऊन माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यामध्ये सर्व इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी स्टुडिओ दुरुस्ती यासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देऊन तातडीने हालचाली झाल्या व काही अंशी निधी सांगली आकाशवाणीकडे प्राप्त झाला व कामही सुरू झाले आहे. आज याची पाहणी केली.
लायब्ररीचे नुकसान झाले आहे. जुन्या सीडी स्वच्छ करून ठेवण्यात आले आहेत, पण तबले व सतारी यांचे पुराच्या पाण्यात नुकसान झालेले आहे. अद्याप ध्वनी मुद्रणाची क्षमता पूर्वीप्रमाणे प्राप्त झालेली नाही. सध्या काम चालू आहे. अजूनही अनेक गोष्टी करण्याच्या बाकी आहेत.
यावेळी नाट्यदिग्दर्शका चेतना वैद्य, मुकुंद पटवर्धन, रवी कुलकर्णी, संजय भिडे, हर्षा बागल, पंकज प्रसादे हे उपस्थित होते. आकाशवाणी केंद्राचे संचालक मंडपे व टेक्निकल प्रमुख अशोकराव सूर्यवंशी यांनी सर्व माहिती दिली.