भाजपच्यावतीने सांगलीत सर्वरोग निदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:22+5:302021-09-26T04:28:22+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : भाजप पश्चिम मंडलाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सांगलीत रोगनिदान व उपचार शिबिर ...

Sangli All Diagnosis Camp on behalf of BJP | भाजपच्यावतीने सांगलीत सर्वरोग निदान शिबिर

भाजपच्यावतीने सांगलीत सर्वरोग निदान शिबिर

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भाजप पश्चिम मंडलाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सांगलीत रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले.

येथील टिळक स्मारक मंदिरात हे शिबिर घेण्यात आले. यात शंभरहून अधिक लोक सहभागी झाले होते. यावेळी उपचारांची गरज असलेल्यांना मोफत उपचार देण्यात आले. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, अरविंद पाटील-निलंगेकर, दीपक माने, केदार खाडिलकर, श्रीकांत शिंदे, पृथ्वीराज पवार, डॉ. साठे, विजय भिडे, नगरसेवक युवराज बावडेकर, सुबराव मद्रासी, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, अविनाश मोहिते, उदय बेलवलकर, सचिन कोरे आदी उपस्थित होते. या शिबिराचे संयोजन भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष दीपक कर्वे, प्रथमेश वैद्य, शांतिनाथ कर्वे, अनिकेत खिलारे यांनी केले.

Web Title: Sangli All Diagnosis Camp on behalf of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.