शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पुन्हा पुराच्या दिशेने, कृष्णा नदी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:09 IST

कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते.

ठळक मुद्देकर्नाळ रोडपर्यंत पाणी : सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे स्थलांतर सुरूसांगली पुन्हा पुराच्या दिशेने, कृष्णा नदी पात्राबाहेर

सांगली : कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते.

दरम्यान, महापालिकेने सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट परिसरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना केल्या आहेत. सायंकाळी सूर्यवंशी प्लॉटमधील दोन कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

खासदार संजयकाका पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सूर्यवंशी प्लॉटला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. धरणातून वाढता विसर्ग व संततधार पावसामुळे रविवारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी १७ फुटापर्यंत खाली होती. पण शनिवारपासून कोयनेतून विसर्ग सुरू झाला. रविवारी सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी २३ फूट होती.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यात पाच फुटाने वाढ होऊन २८ फुटापर्यंत पोहोचली होती. कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून कर्नाळ रोडपर्यंत पाणी पसरले होते. पावसाचा जोर व धरणातील विसर्ग पाहता महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.

शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये ३० ते ३२ फुटाला पाणी शिरते. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या. सकाळी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी चिंतामणी कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी प्लॉटमध्ये ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सूचना दिल्या.

सायंकाळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट दिली. सूर्यवंशी प्लॉटमधील दोन कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणील माने, भलचिम कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला.

शहरातील नागरिकांना पुन्हा पुराची धास्ती वाटत आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील अनेक कुटुंबांनी स्थलांतराची मानसिक तयारी केली आहे. या कुटुंबांनी घरातील साहित्याची आवराआवरही सुरू केली होती.

सांगलीच्या पूरपट्ट्यातून कुटुंबांचे स्थलांतर सुरू झाले आहे. महापालिकेचे कर्मचारी त्यांना मदत करीत आहेत. नागरिकांनी पाणी पातळी वाढण्याची वाट न पाहता वेळीच घराबाहेर पडावे. महापालिकेने स्थलांतरित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था केली आहे. घराबाहेर न पडणाºया नागरिकांची घरे पोलिसांच्या मदतीने सक्तीने सील केली जातील.- नितीन कापडणीस, आयुक्त 

 

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस