शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: मांजराचा पाठलाग करत थेट घरात घुसला बिबट्या; मरळनाथपूर, रेठरे धरण परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:36 IST

हजारे यांनी धाडसाने बिबट्या असलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली.

रेठरे धरण : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे गावच्या पश्चिमेस वस्तीवर असलेल्या बाळू हजारे यांच्या घरात मांजराचा पाठलाग घरत बिबट्या घुसला. याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक पिंजऱ्यासह वस्तीवर धावले. मात्र, बिबट्या कमी वयाचा असल्याचे लक्षात आल्याने आजूबाजूला मादी बिबट्या असल्याची शक्यता गृहित धरुन या बिबट्यास पकडून मरळनाथपूर डोंगराच्या बाजूला पिटाळून लावण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली.मरळनाथपूरच्या पश्चिमेस डोंगराच्या पायथ्याजवळ बाळू हजारे यांची वस्ती आहे. रात्री साडेआठच्या सुमारास हजारे कुटुंबीय घरी जेवण करीत असताना एका मांजराचा पाठलाग करीत बिबट्या थेट त्यांच्या घरात घुसला. बिबट्याला पाहून सर्वजण जेवण सोडून बाहेर पळाले. हजारे यांनी धाडसाने बिबट्या असलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली.तत्काळ ग्रामस्थांना तसेच वनविभागास माहिती दिली. यामुळे हजारे यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली. वनविभागाचे पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी जमावास पांगविले. बिबट्या एका खोलीत बंद असल्यामुळे तत्काळ पिंजरा मागवून बिबट्यास पिंजऱ्यात घेण्यात आले. पकडलेला बिबट्या कमी वयाचा असल्याचे लक्षात आल्यानंतर आसपास मादी बिबट्या असण्याची शक्यता गृहीत धरून ती आक्रमक होऊ नये, यासाठी वस्तीपासून काही अंतरावर मरळनाथपूर डोंगराच्या बाजूला बिबट्याची मुक्तता करण्यात आली. या घटनेने मरळनाथपूर व रेठरे धरण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्या